Saturday 11 October 2014

सम्यक कलांश प्रतिष्ठान च्या ५ व्या वर्धापन दिन


सम्यक कलांश प्रतिष्ठान च्या ५ व्या वर्धापन दिनाच्या सर्व कलIकIर हार्दिक प्रेक्षकांना शुभेच्छा !!

         सम्यक कलांश प्रतिष्ठान अवघ्या ५ वर्षाचा टप्पा ओलांडून नव्या वर्षात पदार्पण करत आहे. गेली ५ वर्ष "नवोदित कलाकारांसाठी हक्कच व्यासपीठ उपलब्द करणे " ह्या धोरण खाली आज वर कित्येक हौशी कलाकारांना एकत्र करून नवनवे कार्यक्रम आपल्या समोर सादर केले .

              गेली ५ वर्षाचा प्रवास हा खूप खडतर असला तरी धैय्याची भूक अजून संपली नाही . मागे वळून पाहिलं तर अपेक्षे पेक्षा खूप काही मिळाल पण त्याच श्रेय हे रंगदेवतेला आणि मायबाप रसिक प्रेक्षकांनमुळेच सध्या झाल आपल प्रेम आणि आशीर्वाद ह्यामुळेच. हा मंच आजवर टिकला व तो पुढे नेहण्यासाठी ज्या ज्या सहकार्य करणाऱ्या प्रत्येक कलाकार आणि हितचिंतक 

ह्यांचे आभार व ५ व्या वर्धापन दिनाचे हार्दिक शुभेच्छा !!!
आजवर नवोदित कलाकारांसाठी हक्कच व्यासपीठ देणार धोरण जस यशस्वी झाल तस यंदाच्या वर्ष पासून " आता धैय्य सुवर्ण काळाचे" हे नव धोरण सुरु होत आहे . रंगभूमी कला कलाकार आणि प्रेक्षक ह्या चौकटीत राहून ह्या रंगदेवतेची व रसिक मायबाप रसिक प्रेक्षकांची सेवा ह्या सम्यक कलांश प्रतिष्ठान कडून सदैव व्हावी हिच ईश्वराकडे प्रार्थना !! 
आपल प्रेम व आशीर्वाद सदैव आमच्या मागे राहो आणि आपल्या साठी आमच्या कडून नव नवीन आयोजन व सादरीकरण आपल्यासाठी घडो .



आपला विश्वासू
श्री . शशांक किसन बामनोलकर (अध्यक्ष - सम्यक कलांश प्रतिष्ठान )

Sunday 7 September 2014

Shree Siddhivinayak mandir (Dance show)

श्री सिद्धिविनायक मंदिरात ३ सप्टेंबर २०१४ रोजी सदर केलेला . नृत्याचा कार्यक्रम 






































Wednesday 6 August 2014

सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित "स्वरामृत" ताल तरुणाईचा , स्वर तरुणाईचा...



सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित "स्वरामृत" ताल तरुणाईचा , स्वर तरुणाईचा...



   दिनांक १४ ऑगस्ट २०१४ रोजी सायं. ४ वाजता …. पु .ल. देशपांडे कला अकादमी हॉल, रवींद्र नाट्यमंदिर , प्रभादेवी , दादर येथे … सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित "स्वरामृत" हा गायनाचा क़र्यक्रम ठेवण्यात आला आहे. तरुण गायक आणि त्यांना साथ देणारे तरुण वादक यांना एकत्र करून सदर मराठी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने मराठी गायन क्षेत्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीने स्वरांची एक मेजवानी रसिक श्रोत्र्यांना अनुभवायला मिळेल एवढे मात्र नक्की … आपणही हा अनुभव घेण्यासाठी नक्कीच या ...












१४ ओगस्ट २०१४ रोजी आयोजित करण्यात आलेला स्वतंत्र दिना निमित्त मराठी गीतांचा संगीतमय कार्यक्रम स्वरामृत  यशस्वी रित्या पु.ल. देशपांडे कला अकादमी हॉल, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, दादर येथे पार पडला.  सदर कार्यक्रमात सर्व तरुण गायक आणि तरुण वादक यांनी रसिक श्रोत्यांना मंत्र मुग्ध केले. ह्या  कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून     
रायगड भूषण  मृदुंग  वादक  माननीय  श्री  पांडुरंग  घाडगे  उर्फ  बंदराज  महाराज  त्यांचे  सगळे  शिष्य  त्यांना  माउली  म्हणतात  तसेच  त्यांना  इतर हि  बरच  पारितोषिक  मिळाले  आहेत.  त्याच  बरोबर  आई  भवानी  महाराष्ट्र  लोकसेवा  संघटनेचे  अध्यक्ष  श्री  अभिजित  पवार  हेही उपस्थित  होते  यांच्या  सघटने  मार्फत  बरीच  समाज  सेवेची  काम  केली  जातात.  ते  खास  वापी, गुजरातहून  ह्या  कार्यक्रमासाठी  उपस्थित  झाले  होते.  गुरु  श्री  बंदराज  महाराज  यांचे  जवळचे  शिष्य  आणि  त्यांच्या  प्रत्यक  गोष्टींचा  कार्यभार  सांभाळणारे  त्यांचे   विश्वासू  श्री  अभिजित  देसाई  हे  हि  उपस्थित  होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी गायकांना , वादकांना तसेच संपूर्ण कार्यक्रमाची भर-भरून स्तुती केली.    
सुनील, प्रीती, संदीप,योगेश,  विजय, प्राची , प्रज्ञा , स्वप्नील , कारण ह्या गायकांनी तर वैभव, संकेत, अनिकेत, विपुल, संजय आणि मंदार ह्या वादकांनी आपल्या कलेची मैफिल आणखी फुलवली.  तसेच जमलेल्या प्रेक्षक वर्गानी सम्यक कलांश प्रतिष्ठानच्या पुढील प्रवासाठी शुभेच्छा दिल्या . 





Wednesday 9 July 2014

स्वरामृत


सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित आणि सम्यक गीतांश प्रस्तुत , 
मराठी गीतांचा 

 स्वरामृत



आपल्याला सांगायला अत्यंत आंनद होत आहे की, येत्या १४ ऑगस्ट २०१४ रोजी, रवींद्र नाट्यमंदिर (मिनी थेटर) प्रभादेवी येथे दुपारी ३.३० वाजता  
               
               सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित आणि सम्यक गीतांश प्रस्तुत ...

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला मराठी गीतांचा कार्यक्रम 
                                               ''स्वरामृत''
 आयोजित केला आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित राहून  कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. 

Tuesday 29 April 2014

MARATHI FOLK SINGING AND FOLK DANCE PROGRAM




मराठी अस्सल लोकगीत आणि  लोकनृत्याचा  रंगमय कार्यक्रम 



राहुल उजगावकर 9773099154