Saturday 8 July 2017

मतिमंद मुलांसाठी बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम



आज ८ जुलै २०१७ पालघर येथील निर्धार प्रतिष्ठान या सातशेतील मतिमंद मुलांसाठी सम्यक कलांश प्रतिष्ठान च्या पी..पपेट्स ग्रुपच्या अंतर्गत पपेट्स ची कार्यशाळा आणि बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम यशस्वी पार झाला. वयानी मोठे असे विद्यार्थी ह्या आश्रमात असतात. वेगळा अनुभव त्यांच्यात राहून मिळाला. छान साथ मिळाली ती निर्धार संस्थेची व संस्थेची कार्यक्रते नयन वाघेला, नागेश ढोणे आणि वैभव चव्हाण ह्यांची. सुंदर सामाजिक उपक्रम होण्यास अनेक लोकांनी सहकार्य केले त्यांचे मनपूर्वक आभार ।।।