Saturday 17 December 2016

सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित कलाकृती अकादमी - नाट्यगंध प्रशिक्षण


सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित
कलाकृती अकादमी - नाट्यगंध प्रशिक्षण
(मुंबई आणि पुणे मध्ये सुरु करत आहे)


१) सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित 'कलाकृती अकादमी' नाट्य प्रशिक्षण मे महिन्यापासून सुरु करत असून.
२) ज्यात नाट्य अभिनय, नाट्य लेखन, दिगदर्शन, प्रकाश योजना, रंगभूषा व नेपथ्य ह्याचे बेसिक प्रशिक्षण दिले जाईल. (वेग वेगळ्या प्रकारचे नाटकांची ओळख व प्रशिक्षण दिले जाईल. )
३) फक्त १०-१५ विद्यार्थ्यांची एक बॅच असेल.
४) प्रशिक्षण आठवड्यातून शनिवार / रविवार (शनिवार किंवा रविवार) प्रत्येक दिवशी ४ तासाचे प्रशिक्षण असेल. तीन महिने चालणारी बॅच असेल. (एकूण १२ शनिवार / रविवार)
५) प्रशिक्षणात मान्यवरांचे मार्गदर्शन असेलच. तसेच नाट्य क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान दिले जाईल. प्रत्ययदर्शी प्रशिक्षणावर जास्त भर दिला जाईल.
६) प्रशिक्षण पूर्ण होताच त्या विद्यार्ध्यांना नाट्यगंध विभागातील एकांकिका, दीर्घांक किंवा नाटकात काम करण्याची संधी मिळेल.
७) प्रशिक्षणाची फी फक्त ५००० /- रुपये (फक्त पाच हजार रुपये) जी धनादेश (चेक) किंवा धनाकर्ष (डी.डी.) द्वारे (सम्यक कालांश प्रतिष्ठान ह्या नावे ) स्वीकारली जाईल.
८) त्याचे प्रमाणपत्र देखील दिले जाईल.
हा उपक्रम मे महिन्यापासून सुरु होणार असून. एप्रिल महिन्यात एक मिटिंग घेण्यात येईल.
पहिली बॅच सहभागी होण्याकरिता खाली दिलेल्या ई-मेल वर आपली माहिती (नाव, पत्ता, जन्म तारीख, संपर्क क्रमांक देण्यात यावा.) कुठली शंका असल्यास मेल करा. त्याचे मेल द्वारे उत्तर देण्यात येईल.

Email - मुंबई skp.kalakrutiacademy@gmail.com / पुणे skp.kkacademy@gmail.com
सम्यक कलांश प्रतिष्ठान बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संकेत स्थळी भेट द्या.
www.samyakkalansh.blogspot.com

Note - सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित कलाकृती अकादमीच्या माध्यमातून सुरु करण्या येण्याऱ्या नाट्य प्रशिक्षणत बालनाट्य प्रशिक्षण सुद्धा सुरु करत आहोत . तसेच वयोगट १२ ते ३०
Registration 30 फेब्रुवारी पर्यंत

Friday 25 November 2016

"सामान्यांचा असामान्य राजा "








यंदाच्या ५६ व्या महाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सम्यक कलांश प्रतिष्ठान सादर करीत आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित २ अंकी नाटक "सामान्यांचा असामान्य राजा " हे सादर करीत आहोत.
दिनांक ४ डिसेंबर २०१६
ठिकाण - रवींद्र नाट्य मंदिर , प्रभादेवी 
वेळ - सकाळ - ११ वाजता
* लेखक / दिग्दर्शक - शशांक बामनोलकर
* सहाय्यक दिग्दर्शन - अक्षता आल्हाट
* गीत / संगीत - विजय गमरे
* संगीत संयोजन - सागर पाटील
* प्रकाश योजना - अक्षय तळेले
* नेपथ्य - नयन वाघेला
* वेशभूषा - प्राजक्ता दडस
* रंगभूषा - वामन गमरे
***कलाकार***
१) प्रोफेसर कांबळे / शाहीर - हर्षल सोनावणे
२) तेजस्वी कुलकर्णी - नम्रता कांबळे
३) नेहा - स्नेहा वातारे
४) रग्या - नागेश ढोणे
५) सद्या - सचिन गोडबोले
६) शाली कांबळे - अक्षता आल्हाट
७) प्रोफेसर ची बायको - प्राची वेंगुर्लेकर
८) गावकरी - संकेत खानविलकर
९) प्रोफेसरची लहान मुलगी शाली - महेश्वरी
१०) शाहू महाराज - मयूर नाईक
११) लोकमान्य टिळक - अरुण सुतार
१२) बालगंधर्व - वैभव चव्हाण
१३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर - नयन वाघेला
१४) रमाबाई आंबेडकर - प्राजक्ता दडस
१५) रघुनाथ सबणीस - अभिजित पाटील
१६) बापूसाहेब महाराज - जयेश गायकर
१७) मामासाहेब खानविलकर - आशिष चव्हाण
१८) राजोपाध्ये भटजी - अक्षय जोष्टे
१९) राजाराम शास्त्री भागवत - महेंद्र राजगुरू
२०) गंगाराम कांबळे - प्रकाश नाचरे
२१) कायदे पंडित अभ्यंकर - संदीप कटके
२२) महार - सागर सूर्यवंशी
२३) फासेपारधी - अनिल पवार
२४) शाहू महाराजांचा सैनिक - मितेश अहिरे
२५) गावकरी नवरा - अजय कारकर
२६) गवारीची बायको - प्राजक्ता दडस
इतर गावकरी - आशिष चव्हाण, सागर सूर्यवंशी, प्रकाश नाचरे, अक्षय जोष्टे, अनिल पवार, अजय कारकर, महेंद्र राजगुरू
आपण नक्की या रविवार ४ डिसेंबर २०१६ रोजी.... सकाळी ११ वाजता... रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे . छत्रपती शाहू महाराजांना भेटायला.. येताय ना..

Tuesday 25 October 2016

Shadow puppets workshops

Samyak kalansh Pratishthanpister organise SHADOW PUPPETS WORKSHOPS
More details give in poster...

सम्यक कलांश प्रतिष्ठान यंदाच्या नाताळच्या सुट्ट्या निमित्त दिनांक ११ , १८ आणि २५ डिसेंबर २०१६ रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी , प्रभादेवी , दादर (रवींद्र नाट्य मंदिर) येथे दुपारी २ ते ४ वाजे पर्यंत  (आयोजित दिवस ३ रविवार आहेत )शॅडो पपेट्स वर्कशॉप चे आयोजन करीत असून इच्छुक सर्व वयोगटातील लोकांस ते खुले आहे. मुंबईत प्रथमच असे आयोजन करीत असून त्यात प्रत्यक्षरित्या पपेट्स बनविण्याचे शिकवले जाणार असून ते हाताळणे हे प्रत्यक्ष शॅडो पपेट्स च्या माहिती व प्रसिद्ध असलेल्या माधुरी काळे मॅडम ह्यांच्याकडून दाखविले जाईल.  सर्व इच्छुक सहभागी लोकांनी सहभागी व्हावे ह्या कारणास्तव फक्त रविवार निवडून ह्याचे आयोजन केले आहे. सर्व सहभागी इच्छुकांनी खाली दिलेल्या नंबरावर आपले नाव नोंदणी करावी. सहभागी नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शॅडो पपेट्स ची सामग्री आयोजकांना कडून पुरवली जाईल. तसेच सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल. 
इच्छुकांनी दिनांक २० नोव्हेंबर २०१६ पर्यंत नाव नोंदणी करावी व मर्यादित प्रवेश आहे . 
सुनील - ८४५२८७५३९०  सागर - ८०८०४३६८२३

Monday 19 September 2016

"७ वा वर्धापन दिन सोहळा "आमचा आनंद, त्यांच्या आनंदासाठी"
















 "७ वा वर्धापन दिन सोहळा "आमचा आनंद, त्यांच्या आनंदासाठी" 


नमस्कार, 
आजवर सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर ठरणारा. सम्यक कलांश प्रतिष्ठान यंदाच्या ११ ऑक्टोबर २०१६ रोजी आपला ७वा वर्धापन दिन साजरा करीत आहेत. ह्या ७ व्या वर्धापन दिना निमित्त बदलापूर येथील  "राम कृष्ण हरी वृद्धाश्रम "  येथे सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध विभागाचा लोकनाट्य "वस्त्रहरण झालं का ?"  ह्या नाटकाचा प्रयोग तेथील वृद्धांसाठी सादर करीत आहोत. तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम खास त्यांच्यासाठी आखत आहोत.  जर आपल्याला ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर नक्कीच होऊ शकता.

वृद्धाश्रमचा पत्ता - राम कृष्ण हरी वृद्धाश्रम, संगोपीत आश्रमा जवळ,  बेंडशील, कुळगाव बदलापूर - पूर्व, 



आपला नम्र,
संपूर्ण सम्यक कालांश प्रतिष्ठान परिवार 

Tuesday 16 August 2016

Thursday 28 July 2016

त्येक सणात आणि प्रत्येक क्षणात आनंद द्विगुणित करायला मनोरंजन


😊
प्रत्येक सणात आणि प्रत्येक क्षणात आनंद द्विगुणित करायला मनोरंजन लागत आणि त्या मनोरंजनाचं साधन हे कलेचं असत. असाच तुम्हा सर्व प्रेक्षकांचा येत्या गणपतीच्या सणाचा आनंद द्विगुणित करायला सम्यक कालांश प्रतिष्ठान सज्ज आहे. सम्यक कालांश प्रतिष्ठान ह्या सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या संस्थेचे ३ विभाग स्वरगंध , नृत्यगंध आणि नाट्यगंध चे खास कार्यक्रम आम्ही आपल्या समोर मांडत आहोत. आपल्या पैकी कोणालाही ह्या खाली दिलेल्या कार्यक्रमाचा प्रयोग आपल्या मंडळात आयोजितअसेल. तर दिलेल्या क्रमांकावर त्वरित संपर्क साधा. 😊 😍 😘

स्वरगंध 🎤🎼(संगीत विभाग ) प्रस्तुत "स्वरामृत" ( भक्ती संगीताचे कार्यक्रम) - 📞८४५२८७५३९०

नृत्यगंध 👯💃🏻(नृत्य विभाग) प्रस्तुत "नाद घुंगरांचा " (लावणी नृत्य कार्यक्रम) व "कला अविष्कार " (मराठी लोक नृत्य कार्यक्रम ) - 📞९७७३०९९१५४

नाट्यगंध 😜🎭 (नाट्य विभाग) प्रस्तुत "वस्त्रहरण झालं का ?"(धमाल विनोदी लोकनाट्य) 📞८८२८४५२०५५

Monday 25 July 2016

सम्यक कालांश प्रतिष्ठान अंतर्गत शाहिरी पथक


नमस्कार,
             सम्यक कालांश प्रतिष्ठान ह्या संस्थेने आजवर सांस्कृतिक कलेचा वारसा जपत आहे व पुढेही जपत राहील. त्यासाठी अनेक उपक्रम सुरु केले गेले. नवोदित कलाकारांना अनेक व्यासपीठ दिले.
             महाराष्ट्र हा लोककलेकचा परिपूर्ण संपत्तीचा खजिना असलेला राष्ट्र हा महाराष्ट्र आहे.  विविध कला गुणांनी संपन्न अश्या महाराष्ट्राला  मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जेव्हा  एल्गार करावा लागा. तेव्हा महाष्ट्रातल्या शाहिरांनी आपल्या पथकातून हि चळवळ पुढे नेहण्यात मोठा वाटा उचलला होता. शाहिर आत्माराम पाटील , शाहिर गव्हाणकर, शाहिर अमर शेख आणि शाहीर अण्णा भाऊ साठे ह्यांची शाहिरी पथके ह्यांनी हा लढा सर्वसामान्य पर्यंत पोहचवून त्यांना ज्वलंत केलं. असा शाहिरी पथक आज खरंतर नाहिसा झाला म्हणण्यास. काही हरकत नाही. गल्ली गोळ्यात ढोल- पथक सुरु झाली पण शाहिरी पथक हरवत गेलेली.  मराठी लोककलेला जिवंत ठेवणारी फळी हरवत गेली.
                       हिच उणीव आणि खंत आपल्या परीने कशी भरात येईल ह्याची गेले २-३ वर्षे वाट पाहत होतो. बरेच तरुण मुले लोककलेचा प्रशिक्षण घेतात काहींना तर तो घरगुती वारसा मिळतो. पण प्रत्येक्षात ह्याचा वापर होणार कसा प्रश्न हल्लीच्या ह्या तरुणाई ला पडतो अशा तरुण हौशी - शिक्षित (लोककला शिक्षित) कलाकारांसाठी सम्यक कालांश प्रतिष्ठान अंतर्गत शाहिरी पथक सुरु करत आहोत . हरवत चालली लोककला आणि कमी पडत असलेला तरुण शाहिरीचा रंग हा विचार करून हे पथक मुंबईत सुरु करत आहोत. इच्छुक कलाकारांनी दिलेल्या ईमेल वर मेल करा. 

Wednesday 20 July 2016

puppets workshops

Hello!
Like all other projects of Samyak kalansh pratishthan ,we are starting a new project. Along with swargandha, nrutyagandha, and natyagandha , we are introducing puppets workshops.Young students (age 16-22) can be a part of this new project. In this project ,we will teach the participants to make puppets and they would be allowed to participate in the puppets show organised by Samyak kalansh pratishthan. Interested students please send your entries to

email - natyagandh@gmail.com/Samyak.kalansh@gmail.com


नमस्कार,
सम्यक कालांश प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमा प्रमाणे नाव उपक्रम सुरू केला आहे. स्वरगंध, नृत्यगंध आणि नाट्यगंध प्रमाणे सम्यक कालांश प्रतिष्ठान अंतर्गत कळसूत्री बाहुल्यांचा (पी. पपेट्स ग्रुप) विभाग सुरू केला आहे. ज्यात तरुण मुल-मुली सहभागी (वय वर्ष १६ ते २२ ) होऊ शकतात. ह्या विभाग अंतर्गत तरुण मुल-मुली ह्यांना कसूत्री बाहुल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल व ते कलाकार पुढील कळसूत्री बाहुल्यांच्या कार्यक्रमात व कार्यशाळेत सहभागी केले जातील. इच्छुक तरुण कलाकारांनी खाली दिलेल्या ई-मेल वर आपली माहिती पाठवून द्यावी.
सूचना - सहभागी इच्छुक असणारे कलाकार मुंबईतील असावे .
email - natyagandh@gmail.com / samyak.kalansh@gmail.com
#puppets #rajasthanipuppets #westernpuppets #teachpuppets #puppetsworkshop #samyakkalansh





Thursday 14 July 2016

पस्थित राहिलेल्या फिल्म मेकर व सदिच्छा व्यक्त केलेल्या सर्व रसिक प्रेक्षांचे मनपूर्वक आभार !!!!!

पस्थित राहिलेल्या फिल्म मेकर व सदिच्छा व्यक्त केलेल्या सर्व रसिक प्रेक्षांचे मनपूर्वक आभार !!!!!
सम्यक कलांश प्रतिष्ठान आणि १०७.८ मस्ट रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ वा मस्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल ११ जुलै ते १३ जुलै २०१६ रोजी मुंबई विद्यापीठ (कालिना कॅम्पस) येथे पार पडला. तीन दिवस आयोजित ह्या महोत्सवात सामाजिक विषयांवर आधारित भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय लघुपट दाखविण्यात आले. लंडन , रशिया, मॉस्को सारखे देशातील, यु. पी. , आसाम, तेलंगणा , केरळ , तामिळनाडू सारख्या राज्यातून तसेच कोल्हापूर , लातूर , औरंगाबाद , पुणे , ठाणे व मुंबई सारख्या वेग वेगळ्या शहरातून शॉर्ट मेकरच्या शॉर्ट फिल्मस दाखविण्यात आले.सदर फेस्टिवल मध्ये ५० शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये दाखविण्यात आले . प्रत्येक शॉर्ट फिल्म दाखविल्या नंतर त्या शॉर्ट फिल्म मेकर सोबत प्रेक्षकांचा खुला शॉर्ट फिल्म विषयी संवाद ठेवण्यात आले. तसेच फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी शॉर्ट फिल्म मेकर आणि प्रेक्षक ह्यांच्यात चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी "सखे ताक पुढचं पाऊल " ह्या मालिकेतील शर्मिला शिंदे (रुपाली) , सिने अभिनेता अनिल मांगे आणि सिने दिग्दर्शक मयूर तांबे ह्यांची उपस्थिती लाभली. तसेच रंगभूमी वर आलेले नाटक "आमची मुंबई " ह्या नाटकाची टीम ह्यांनी देखील आपली उपस्थिती फेस्टिवल मध्ये दर्शविली. एक अनोखा असा अभिनव उपक्रम हौशी आणि अनुभवी शॉर्ट फिल्म मेकरला हक्काचं व्यासपीठ देणारा फिल्म फेस्टिवलच्या विश्वात घडला असावा. गेले ५ वर्ष फेसाबुकं सारख्या प्रसार माध्यमातून ह्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलला भरगोस प्रतिसाद मिळत आहे. तरुण मंडळींचा सहभाग असलेला सम्यक कालांश प्रतिष्ठान आणि १०७.८ मस्ट रेडिओच्या अनोख्या उपक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या अभिप्रायातून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या .

Tuesday 21 June 2016

MUST ISFF 2016 Schedule...entry free.......





 जागतिक चित्रपट सृष्टीत वेग वेगळे उपक्रम महोत्सवाद्वारे आयोजित केले जातात. बरेच महोत्सवाला स्पर्धेचे स्वरूप जास्त असते. अशा स्पर्धेमुळे हौशी लघुपटांना तांत्रिक कमतरतेमुळे कमी वाव मिळतो. अशी परिसथिती लघुपट निर्माते खचले जातात . हीच परिस्थिती पाहता सम्यक कालांश प्रतिष्ठान आणि १०७.८ मस्ट रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मस्ट आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव मुंबई विद्यापीठात आयोजनाचा अभिनव उपक्रम २०१२ साली सुरू करण्यात आला. ह्या महोत्सवात अनुभवी व हौशी लघुपट निर्मात्यांचे लघुपटांसाठी हक्काचे व्यासपीठ ह्या महोत्सवाद्वारे निशुल्क खुला करण्यात आला. गत वर्षी प्रमाणे यंदा देखील लघुपट निर्माते सक्रिय सहभागी झाले आहेत. दिनांक ११ जुले ते १३ जुले २०१६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत सम्यक कालांश प्रतिष्ठान आणि १०७.८ मस्ट रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ५वा मस्ट आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०१६मुंबई विद्यापीठात (कालीन कॅम्पस) येथे आयोजित करण्यात आले. सदर महोत्सवात वेग वेगळ्या देशातील सामाजिक विषयांवर आधारित ४८ लघुपट दाखवणार आहे . लघुपट दाखविल्या नंतर लघुपट निर्माता व उपस्थित प्रेक्षक यांच्यात परिसंवाद साधला जाणार आहे .
                          प्रत्येक कलाकृती प्रेक्षकांशिवाय अधुरी असते. हे लक्षात घेऊन आयोजकांनी सर्व वर्गातील प्रेक्षकांसाठी हा आंतरराष्ट्रीय महोत्सव पाहण्या करिता सुरू केला असून. सर्व प्रेक्षकांनी उपस्थित राहून लघुपट निर्मात्यांनी सादर केलेल्या लघुपटास प्रोत्साहन द्यावे. असे कळविण्यात आले आहे .


All over the world various events are conducted by film industries. Most of them are competitions. In such competitions the newcomers and newbies doesn't stand in at level due to lack of equipments and technology. Thus they get demotivated. Thus in order to overcome the same and provide them a platform Samyak Kalansh Pratishthan and 107.8 MUST Radio in collaboration started organising MUST International Short Film Festival at Mumbai University(Kalina) from the year 2012. This festival provides platform to all the experienced as well as newcomers at free of cost. Alike last year, this year also many short film producers have participated. The 5th MUST International Film Festival is organised on 11th July to 13th July 2016 from 10 a.m. to 5 p.m. by Samyak Kalansh Pratishthan in collaboration with MUST Radio and Mumbai University(Kalina Campus). Total 48 Short films based on Social issues from various parts of the world would be screened. After the screening of each film there would be direct communication between the producers and the audience. Such events are incomplete without the audience thus for the same the organisers have kept the MUST International Film Festival open for all. Be present in large numbers to make the event successful.

Saturday 11 June 2016

सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत कळसूत्री विभाग (पी . पपेट्स )


सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत कळसूत्री विभाग (पी . पपेट्स ) सुरु करत आहोत . सदर विभगा मार्फत कळसूत्री बाहुल्यांचे कार्यक्रम व कार्यशाळा सुरु करत आहोत . त्यासाठी नवीन हौशी तरुण मुल हवे आहेत . जे कोणी इच्छुक असून यांनी त्वरित आपली माहिती दिलेल्या ईमेल वर पाठवून द्यावी .
सूचना -
मुलं मुंबईत राहणारी असावी .
त्यांची वयोमर्यादा वय १६ ते २१ वर्ष असावे.
Email- natyagandh@gmail.com

Wednesday 18 May 2016

R.J. radio jokey course

सम्यक कलांश प्रतिष्ठान चा आणखी एक नवा उपक्रम आपल्यासाठी … इच्छुकांनी नक्कीच ह्याचा लाभ घ्यावा .


Samyak Kalansh Pratishthan is coming up with different project. The course for Radio Jockey is starting in Mumbai. Course starts in coming June 2016 and will deal with voice modulation and technical instruments usage. The practicals would be carried under the guidance of experts in the field. Moreover the course is on Sundays and thus the public at large will be benefited and also manage to be a part of the course. For further information contact: sagar - 8080436823 / shashank - 9664159343 or blog - www.samyakkalansh.blogspot.com



सम्यक कलांश प्रतिष्ठान च्या वेगळ्या उपक्रम प्रमाणे एक नवीन उपक्रम यंदा पासून सुरु करत आहे . रेडीओ जोकी चा हा कोर्स संस्थे अंतर्गत मुंबई मध्ये सुरु करत आहे . येत्या जून महिन्या पासून ह्याची सुरुवात करणार असून प्रत्यक्ष रित्या सहभागी विद्यार्थी ह्याचा लाभ घेणार आहे . आवाजाचा उपयोग व तांत्रिक यंत्रणेची हाताळणी कशी करावी . ह्याचे प्रत्येक्ष शिक्षण त्या क्षेत्रातील मातबर मंडळी कडून देण्यात येणार आहे. कोर्सेस चे प्रशिक्षण फक्त रविवारी असल्यामुळे बऱ्याच लोकांना ह्याचा लाभ होणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी अधिक माहिती साठी खालील नंबरावर चौकशी करावी. सागर - ८०८०४३६८२३ / शशांक - ९६६४१५९३४३ किंव्हा ब्लोग वर माहिती मिळवावी - www.samyakkalansh.blogspot.com


Monday 16 May 2016

P. puppets workshop in pune

सम्यक कलांश प्रतिष्ठान चे एक पाऊल पुढे . मुंबई नंतर पुणे शहरात पहिल्यांदाच मोफत कळसूत्री बाहुल्यांची कार्यशाळा आयोजित करत आहोत. हि कार्यशाळा लहान मुलांसाठी आयोजित केली असून एक दिवसीय कार्यशाळा आहे . पुणेकरांनी नक्की ह्या नव्या उपक्रमाचा लाभ घ्यावा .




दिनांक २१ मे २०१६ रोजी पुणे शहरातील पहिला पपेट्स वर्कशोप चे क्षण जे सम्यक कलांश प्रतिष्ठान आयोजित पी. पपेट्स वर्कशोप






























Friday 15 April 2016

Sunday 27 March 2016

२७ मार्च २०१६ हा जागतिक रंगभूमी दिन "नाट्यगंध महोत्सव"

२७ मार्च २०१६ हा जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी रंगभूमी हि मराठी माणसाच्या संस्कृतीतील एक विभाज्य भाग, नव नवीन प्रयोग व उपक्रम  मसातत्याने मराठी रंगभूमीवर घडत असतात. असाच एक अभिनव उपक्रम २७ मार्च २०१६ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजे पर्यंत , शाहीर अमर शेख हॉल , विद्यार्थी  भवन , चर्चगेट येथे  सम्यक कलांश प्रतिष्ठान आणि शासकीय विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "नाट्यगंध महोत्सवात" झाला. गेल्या वर्षभरात स्पर्धेत अंतिम विजेते न झालेल्या व  नजरे आड राहिलेल्या एकांकिका ह्या महोत्सवात प्रेक्षकांना विनामुल्य दाखविण्यात आल्या . चांगल्या कलाकृती स्पर्धात्मक शर्यतीत काही शुल्लक कारणाने मागे राहत त्यामुळे बरेच कलाकारांचे खचीकरण  होते.  ते खचीकरण थांबविण्यासाठी, तसेच त्या कलाकारांना हक्काचं व्यासपीठ महोत्सवाद्वारे देण्यात आले. एकांकिका सादर झाल्या नंतर तो संघ आणि प्रेक्षक यांच्यात परिसंवाद ठेवण्यात आले. असा प्रयोग पहिल्यांदाच नाट्य महोत्सवात झाला व त्याची सर्व कलाकारांनी तसेच प्रेक्षकांनी भरगोस स्तुती केली . ह्या महोत्सवात जिद्द (अभिनयधारा, मुंबई ) , बेडूक रमी आणि तुम्ही (कलायात्री, डोंबिवली), दाभोलकरांना दिसलेलं भूत (नाट्यगंध, पुणे ) , तीन चोर एक पोळी व एक बेंच (फस्ट शो क्रियेशन, भांडूप) आणि अभंग (टीम आर, ठाणे )असे  ५ एकांकिका व प्रेमानंद गज्वी लिखित २ अंकी नाटक देवनवरी चा विशेष प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळाला . नजरे आड कलाकृती प्रमाणे नजरे आड राहिलेल्या रंगभूमी सेवकांचा सत्कार सोहळा महोत्सवात यशस्वी पार पडला. श्री. प्रभाकर म्हसकर ( जेष्ठ  दिग्दर्शक), श्री . अशोक पालेकर (जेष्ठ नेपथ्यकार) व श्री. चंदर पाटील ( रंगभूषाकार) अशा दिग्गज रंगभूमी सेवकांचा सत्कार झी वाहिनी चे वरिष्ठ कार्यकारी निर्माते श्री . निलेश मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले.  आयुष्याची बरीच मोठी कारकीर्द असून स्वताचा कुठेही गाजा-वाजा  न करणारी मंडळी ह्यांचा हा सत्कार सोहळा होता . सत्कार मूर्तीच्या हस्ते सहभागी एकांकिका संघाना स्मृतीचींह व प्रमाण पत्र देण्यात आले . सर्व प्रेक्षक , कलाकार , मान्यवर तसेच सत्कारमूर्ती ह्यांनी ह्या महोत्सवाची भरगोस स्तुती केली. तसेच हा महोत्सव आणखी मोठ्या स्वरुपात व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याला आयोजकांनी साकारांत्मक प्रतिसाद दिला . तसेच महोत्सव यशस्वी करण्यात मोलाचा वाट असणाऱ्या सर्व सहभागी संघांचे, प्रेक्षकांचे तसेच मान्यवरांचे आभार मानले .'