Saturday 15 December 2018

विनामूल्य चित्रकथी कार्यशाळा



दिनांक २२ व २३ डिसेंबर २०१८ दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी(मुंबई) येथे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र - नागपूर यांच्या सहयोगाने सम्यक कलांश प्रतिष्ठान यांच्यावतीने "चित्रकथी " ह्या महाराष्ट्राच्या पारंपरिक चित्रकलेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर आदिवासी समाजाची लोककला श्री. परशुराम गंगावणे ह्यांनी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी - गुढीपूर येथे जतन व संवर्धन केली आहे. अशा लुप्त होणाऱ्या लोककलेला पुन्हा लोकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने सम्यक कलांश प्रतिष्ठान सदैव कार्यरत आहे. सदर कार्यशाळेचे प्रशिक्षण श्री. एकनाथ परशुराम गंगावणे करणार आहे. तसेच सांस्कृतिक कलेचा वारसा जपणारी आपली लोककला पुनर्जीवित होऊन नावीन्याने उदयास यावी ह्या हेतूने मुंबई सारख्या शहरात त्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. हि कार्यशाळा विनामूल्य असून त्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग दर्शवावा असे आव्हान सम्यक कलांश प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. शशांक किसन बामनोलकर यांनी केले आहे. कार्यशाळे करिता आपली नावनोंदणी दिलेल्या नंबरावर करावी. अक्षय ९८६९९९४०४४ /अनिकेत ९८२१७११४६२

Sunday 9 December 2018

Christmas vacation workshop 2018






सम्यक कलांश प्रतिष्ठान (रजि.) अंतर्गत 
*कलाकृती अकादमी* 

*नाताळ सुट्टीतील कार्यशाळा*
(फक्त खास लहान मुलांसाठी कार्यशाळा )

*गायन - नृत्य - हस्तकला* 

+ दिनांक - २३, २४ आणि २५ डिसेंबर २०१८ 
+ वेळ - सायंकाळी ४ ते ६ वाजे  पर्यंत 
+ ठिकाण - पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई . 

+ वयोमर्यादा - ५ वर्षावरील ते १५ वर्षापर्यंत 
+ नाव नोंदणीसाठी संपर्क - ९८२१७११४६२ / ८१६९४९७४९३. 





Wednesday 7 November 2018

प्रेक्षक सभासद नोंदणी अर्ज






सम्यक कलांश प्रतिष्ठान (रजि.) , मुंबई 

प्रेक्षक सभासद नोंदणी अर्ज
सम्यक कलांश प्रतिष्ठान गेले वर्ष विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. यंदाच्या १० व्या वर्धापन दिना निमित्त प्रेक्षक सभासद नोंदणी सुरु करत आहोत. ज्यात सम्यक कलांश प्रतिष्ठान (नाट्य, नृत्य , गायन ) यांसारखे कार्यक्रम प्रत्येक महिन्यात एका नाट्यगृहात आयोजित / सादर करणार आहे. त्या कार्यक्रमाच्या २ प्रवेशिका ह्या सभासदास वर्गास (सम्यक कलांश प्रतिष्ठानचे प्रेक्षक सभासदास) माफक दरात उपलब्ध होणार आहे. तसेच सदर सभासदास सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत कलाकृती अकादमीच्या प्रत्येक कार्यशाळेच्या प्रवेश शुल्कात सवलत मिळणार आहे. हि सेवा एप्रिल २०१९ पासून अमलात येणार असून आपण आपली नाव नोंदणी त्वरित करावी.
*सम्यक कलांश प्रतिष्ठान - प्रेक्षक सभासद वार्षिक वर्गणी रु. ५००/- ( पाचशे रुपये )

*टिप -१) नाव नोंदणी करिता कोणत्याही प्रकारे शुल्क नाही. आपला प्रतिसाद पाहून सर्व इच्छुक सभासदांची बैठक घेऊन पुढील वर्षाची माहिती दिली जाईल व अधिकृत सभासद म्हणून नाव नोंदणी केली जाईल.
२ ) ह्यात वयाची अट नाही.


Sunday 28 October 2018

*प्रकाशमय दीप*

*प्रकाशमय दीप*
अनाथ, गरीब गरजू मुलांसोबत साजरी करू अनोखी दिवाळी
या.. गरिबी वस्तीत श्रीमंत मनाची ज्योती पेटवू

नमस्कार,
यंदाच्या वर्षी आम्ही अंधारलेल्या गरीब गरजू लहान मुलांसोबत दिवाळी साजरी करतोय. त्यात काही अनाथ आहेत तर काही रस्त्यावर राहणारी. एक छोटा प्रयत्न करतोय त्यांच्या सोबत एक अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा. लहानमुलांच्या बुद्धिकौशल्याचे खेळ, बोलक्या बाहुल्याचे खेळ - कला आणि मनोरंजन सोबत संपूर्ण दिवस घालविण्याचा एक प्रयत्न आम्ही करतोय. आर्थिक अपुऱ्या अडचणीत प्रज्वलित झालेल्या दिवाळीत अंधारात राहणाऱ्या गरिबीत श्रीमंतीची ज्योत पेटवुया..

जर आपण वरील उपक्रमास आर्थिक सहकार्य करणार असाल तर आपली आर्थिक देणगी खाली दिलेल्या संस्थेच्या बँक अकाऊंट वर पाठवून द्या.   

आपला अभिलाषी
श्री. शशांक बामनोलकर- 9664159343
अध्यक्ष - सम्यक कलांश प्रतिष्ठान, मुंबई

SAMYAK KALANSH PRATISHTHAN
Bank name - NKGSB Bank
Branch - Bandra, East
BANK AC N0. - 005100100013094
IFSC -  NKGS0000005
Branch Code - 000005
MICR - 400086005

Monday 1 October 2018

"चित्रकथी" कार्यशाळा



नमस्कार,
सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत कलाकृती अकादमीच्या माध्यमातून दिनांक २४ आणि २५ नोव्ह २०१८ रोजी ज्या महाराष्ट्राची गहाळ होत चालली लोक कला "चित्रकथी" कार्यशाळा आयोजित करत आहोत. त्या कार्यशाळेबद्दल व ती लोक कला जतन- संवर्धन करणाऱ्या गंगावणे कुटुंबाची मुलाखत न्यूज चॅनेलवर दाखविण्या आली. सविस्तर माहितीसाठी दिलेल्या लिंकवर क्लीक करा.

न्यूजची बातमी - https://www.youtube.com/watch?v=0gDCfQZ3gmo

कार्यशाळेसंबंधी अधिक माहिती - https://www.facebook.com/events/576717012744616/?event_time_id=576717016077949

सम्यक कलांश प्रतिष्ठान अधिक माहितीसाठी संपर्क - www.samyakkalansh.blogspot.com

आपला अभिलाषी
सम्यक कलांश प्रतिष्ठान (रजि.), मुंबई

Friday 28 September 2018

*।आमंत्रण।* ९ व्या वर्धापन दिनानिमित्त


*सम्यक कलांश प्रतिष्ठान (रजि.)*
स्थापन दिन ११ / १०/ २००९

*। आमंत्रण।*

यांच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त 
स्वेच्छा मूल्य प्रयोग 
 ११ ऑक्टोबर 
 १० प्रयोग 
 ०९ व्या वर्धापन दिनानिमित्त 

सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित 
नाट्यगंध प्रस्तुत 

धमाल विनोदी लोक नाटय
*बिन बाईचा राजवाडा* 

लेखक / दिग्दर्शक / निर्मिती प्रमुख - शशांक बामनोलकर 

दिनांक ११ ऑक्टोबर २०१८  । सायंकाळी ८ वाजता 
। रवींद्र नाट्यमंदिर - मिनी थिएटर , प्रभादेवी ।

प्रवेश विनामूल्य ( प्रवेशिका आर्धा तास पूर्वी नाट्यगृहावर उपलब्ध)


आपला अभिलाषी 
*श्री. शशांक कि. बामनोलकर* 
(अध्यक्ष - सम्यक कलांश प्रतिष्ठान )

Friday 24 August 2018

*|| नानारुचि रसिकां दे केवळ नाटक पुरें समाधान ।।*



*|| नानारुचि रसिकां दे केवळ नाटक पुरें समाधान ।।*
*- कविकुलगुरु कालिदास*
प्रति,
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
*विषय- आपल्या गणशोत्सव मंडळात नाटक सादर करण्याची संधी उपलब्ध करुन देण्याबाबत.*
महोदय/महोदया,
सम्यक कलांश प्रतिष्ठान गेले ९ वर्ष सांस्कृतिक कार्य क्षेत्रात कार्यरत आहे. कला संवर्धन, जतन व प्रसार या उद्देशाने नृत्य, गायन आणि नाटक अशा विविध माध्यमांतून सांस्कृतिक उपक्रम संस्था यशस्वीरित्या राबवत आहे.
‎आपले मंडळ स्थानिक लोकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. आपण मराठी भाषेचा प्रसार आणि संवर्धन करीत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या महाराष्ट्राला लोककलेचा खुप मोठा वारसा लाभला आहे. समाजात एकोपा निर्माण व्हावा आणि समाजप्रबोधन व्हावे या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. आज आपले मंडळ ह्या कार्यात मोलाचे योगदान देत आहे. उपरोक्त संस्था सम्यक कलांश प्रतिष्ठान लोकनाट्याचे जतन व्हावे या उद्देशाने *'बिन बाईचा राजवाडा'* या नाटकाचे प्रयोग करीत आहे. सदर नाटक बुवाबाजी या विषयावर आधारित असून त्यावर कलाकारांनी विनोदी ढंगाने खुमासदार भाष्य केले आहे.
‎आपल्या मंडळाद्वारे तेथील स्थानिक प्रेक्षकांसाठी आम्ही सदर नाटकाचा प्रयोग माफक मानधनात करू इच्छितो. तरी आपण या नाटकाचा प्रयोग आपल्या मंडळात सादरकरण्याची करण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी, हि नम्र विनंती.
जर आपण प्रयोग पाहण्यासाठी इच्छुक असाल तर आम्हाला कळवा, मुंबईत होणाऱ्या ऑगस्ट महिन्यातील प्रयोगा विषयक आम्ही आपणास कळवू.
संपर्क : +919821711462 / 9664159343
‎ आपला अभिलाषी,
‎ *शशांक बामनोलकर*
( लेखक / दिग्दर्शक - बिन बाईचा राजवाडा)



Saturday 16 June 2018

कार्यशाळा सत्र पहिले संपन्न

सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित कलाकृती अकादमी च्या नृत्य कार्यशाळेचे.. आज पहिले सत्र संपन्न झाले .. लोकनृत्य प्रशिक्षणासाठी श्री सदानंद राणे सर व रंगभूषा च्या सत्रासाठी श्री गणेश कारंडे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.. त्यांस मनपुर्वक धन्यवाद.. उद्याचे शास्त्रीय नृत्याचे सत्र डॉ. श्रीमती किशु पाल यांच्या मार्गदर्शनाखाली..

Saturday 26 May 2018

नृत्य कार्यशाळा

सम्यक कलांश प्रतिष्ठान गेले ९ वर्ष सांस्कृतिक कार्य क्षेत्रात ना नफा ना तोटा या तत्वावर कार्यरत आहे. कला संवर्धन, जतन व प्रसार या उद्देशाने विविध सांस्कृतिक उपक्रम संस्था यशस्वीरित्या राबवत आहे.
येत्या दिनांक १६ व १७ जून २०१८ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित कलाकृती अकादमीच्या माध्यमातून नृत्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ह्या कार्यशाळेत लोकनृत्य व शास्त्रीय नृत्य यांवर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सदर कार्यशाळेत लोकनृत्याचे जेष्ठ दिग्दर्शक व अभ्यासक श्री सदानंद राणे सर यांसकडून लोकनृत्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. श्री सदानंद राणे सर यांनी अनेक वर्ष सह्याद्री वाहिनीवरील लोकप्रिय धिना धिन धा या कार्यक्रमात परिक्षक म्हणून कार्य केले आहे. तसेच ते अनेक लोकनृत्यांच्या कार्यक्रमात नृत्यदिग्दर्शकाची भूमिका चोख बजावत आहेत. शास्त्रीय नृत्यासाठी श्रीमती डॉ.किशु पाल मॅडम या प्रशिक्षण देणार आहेत. डॉ.किशु पाल मॅडम यांनी तंजावर घराण्यातील पंडित श्री वेणूगोपाल पिल्लई यांच्याकडून भरतनाट्यम् आणि डॉ.व्यंकटेश्वर राव यांच्याकडून कुचिपुडी या शास्त्रीय नृत्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच या नृत्यांच्या प्रशिक्षणात त्यांनी पदवी देखील मिळवली आहे.
अशा दिग्गज व्यक्तिमत्वांकडून प्रशिक्षण घेण्याची अमुल्य संधी रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर येथे उपरोक्त संस्था सम्यक कलांश प्रतिष्ठान यांच्याकडून सर्वांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. तसेच रंगभूषेची सत्रही या कार्यशाळेत घेण्यात येणार आहे. कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे व त्यांना संस्थेच्या आगामी कार्यक्रमात संधी देण्यात येईल. तरी इच्छूकांनी दिलेल्या क्रमांकावर लवकरात लवकर नावनोंदणी करावी असे संस्थेकडून आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क: ९८९२३९२३०६ / ९८२१७११४६२

Tuesday 15 May 2018

नृत्य कार्यशाळा नाव नोंदणी सुरु





नमस्कार 
आपणास कळविण्यात येत आहे कि सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत कलाकृती अकादमीच्या माध्यमातून दिनांक १६ व १७ जून २०१८ रोजी सकाळी  ८ ते दु. २ वाजेपर्यंत नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हि नृत्य कार्यशाळा लोकनृत्य व शास्त्रीय नृत्य अशा २ विभागात  आखली गेली आहे. लोकनृत्याच्या मार्गदर्शनासाठी जेष्ठ लोकनृत्य दिग्दर्शक व लोकनृत्य अभ्यासक श्री. सदानंद राणे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहे.सदानंद राणे सर अनेक वर्ष सह्याद्री वाहिनीवरील 'धिना धिन धा' या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून कार्यरत असून तरुणांना लोकनृत्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.
 तसेच शास्त्रीय नृत्यासाठी प्रसिद्ध भरतनाट्यम / कथक प्रशिक्षिका ह्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे. डॉ.किशु पाल यांनी अनेकांना शास्त्रीय नृत्याचे धडे दिले आहेत. सदर कार्यशाळा पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित केली असून हि कार्यशाळा सर्व वयोगटातील लोकांसाठी खुली आहे. कार्यशाळेत सहभागी होणार्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तरी जास्तीतजास्त जणांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे संस्थेने आवाहन केले आहे.
कार्यशाळेत सहभागी होण्याकरिता दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.
९८९२३९२३०६
९८२१७११४६२

Tuesday 8 May 2018

*कलाकृती अकादमी - नृत्य कार्यशाळा*

*सम्यक कलांश प्रतिष्ठान* संचालित

*कलाकृती अकादमी - नृत्य कार्यशाळा*

👉🏻  दिनांक शनिवार १६ व रविवार १७  जुन २०१८ रोजी
👉🏻  सका. ८ ते २ वा. पर्यंत (दोन्ही दिवस)
👉🏻 शास्त्रीय नृत्य व लोकनृत्य यांची  ओळख.
👉🏻  अनुभवी मार्गदर्शन व प्रशिक्षण.
👉🏻  ग्रृपला माफक फि
👉🏻 कार्यशाळेत सहभागी होण्याचे प्रमाणपत्र.

कार्यशाळा शुल्क ₹ १०००/- (दोन्ही दिवस)

👉🏻 *कार्यशाळा / ठिकाण :-*  लावणी हॉल , ३रा मजला,
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रविंद्रनाट्य मंदिर , सिध्दी विनायक मंदिर मागे, प्रभादेवी,  दादर -(प.), मुंबई.

संपर्क - ९८९२३९२३०६

Tuesday 10 April 2018

१ मे २०१८ रोजी सम्यक कलांश प्रतिष्ठान वृध्दाश्रमात सादर करेल.. स्वरामृत

१ मे २०१८ रोजी सम्यक कलांश प्रतिष्ठान वृध्दाश्रमात सादर करेल.. स्वरामृत
स्थळ - सक्षवाह वृध्दाश्रम


Saturday 7 April 2018

अभिनय कार्यशाळा

*सम्यक कलांश प्रतिष्ठान* अंतर्गत *कलाकृती अकादमी* आयोजित
*_"अभिनय कार्यशाळा" वर्ष २रे_*
दिनांक १३ मे २०१८ पासून मुंबई येथे सुरु होत आहे.

👉🏻 *प्रमुख मार्गदर्शक*
१) *श्री. संजीव धुरी* : अभिनेता - नाटक, चित्रपट, जाहिरात व मालिका नाट्यदिग्दर्शक
२) *श्री. उमेश घळसासी* : एम.ए.नाट्यशास्त्र, अभिनेता, प्रशिक्षक व्हाईस कल्चर, आकाशवाणी निवेदक

👉🏻  दिग्गज, अनुभवी व कार्यशील *मान्यवरांचे मार्गदर्शन* कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
👉🏻अभिनय हि कला प्रत्येयदर्शी आहे म्हणून कार्यशाळेचा *उद्देश हा प्रत्येयदर्शी असेल.*
👉🏻कार्यशाळेतील सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांवर लक्ष देता यावे म्हणून *मर्यादित विद्यार्थी* असतील. तसेच हि बॅच वर्षातून एकच असेल.
👉🏻 *महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २०% सवलत* आहे.

🔸 *सूचना*- _सहभागी इच्छुक विदयार्थ्यांची मिटिंग घेऊनच पुढील कार्यशाळा प्रवेश सुरु होईल._

♦नाव नोंदणीसाठी संपर्क साधा.
📞 ७०४५७५३९९२

Tuesday 20 February 2018

Good wishes from Mr. Ramdas Athavale (Minister of social justice , Govt. Of India )

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री
श्री. रामदासजी आठवले साहेब
यांनी सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित व नाट्यगंध थिएटर प्रस्तुत
धमाल विनोदी लोकनाट्य "बिन बाईचा राजवाडा" ह्या नाटकाच्या शुभारंभ प्रयोगासाठी
दिलेल्या अमूल्य शुभेच्छा,,,!
--------------------------------------------------------------------
शुभारंभ प्रयोग - बिन बाईचा राजवाडा
दिनांक ३ मार्च २०१८
सायंकाळी ४ वाजता
रवींद्र नाट्यमंदिर - मिनी थिएटर , प्रभादेवी - दादर

बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ९८२१७११४६२

https://youtu.be/B2v9Tf1eI7M

Monday 12 February 2018

बिन बाईचा राजवाडा

*_।। वंदितो रंगभूमी । वंदितो रंगकर्मी ।।_*

 *।। शुभारंभ प्रयोग |।*
सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित
नाट्यगंध थिएटर प्रस्तुत
२ अंकी धमाल विनोदी लोकनाट्य
*"बिन बाईचा राजवाडा"*
लेखक/ दिग्दर्शक/ निर्मिती प्रमुख - शशांक बामनोलकर
दिनांक: ३ मार्च २०१७ । सायंकाळी ४ वाजता
ठिकाण - मिनी थिएटर- रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर 
रंगभूषा - सौ. नम्रता सोनवणे , प्रकाश योजना - जयेश पवार,
नृत्य दिग्दर्शक - अश्विनी कारंडे, नेपथ्य - अरुण सुतार
संगीत संयोजक /रंगमंच व्यवस्थापन - अनिकेत मेस्त्री 
कलाकार -
आशिष चव्हाण , प्रकाश नाचरे, संदीप कटके, महेश गुरव, नागेश ढोणे, हर्षल सोनवणे, महेंद्र राजगुरू, अक्षय पाटणे, सचिन खांबे, नयन वाघेला, वैभव चव्हाण
नृत्यकार - संदेश सातव
प्रवेशिका - रु. १००/-
बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ९८२१७११४६२
ऑनलाईन बुकिंगसाठी दिलेल्या संकेत स्थळी भेट द्या.
www.ticketees.com
होळीचा रंगात.. हास्याचा गंध.. तुमच्या संग...
प्रयोगाला नक्की या...


Tuesday 6 February 2018

सम्यक कलांश प्रतिष्ठान "चित्रपट विभाग" - Samyak kalansh pratishthan - film department




सम्यक कलांश प्रतिष्ठान "चित्रपट विभाग" 
नमस्कार,
आपणास सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे कि येणारे वर्ष हे सम्यक कलांशचे दशकीय वर्ष आहे (११ऑक्टोबर २०१८ ते ११ऑक्टोबर २०१९). आजवर संस्थेच्या विविध विभागाच्या मध्यातून काहींना काही कार्य आजवर कार्य चालू
 सम्यक कलांश प्रतिष्ठान "चित्रपट विभाग"  आहे. अशा विभागात आणखी एका विभागाची भर होणार असून एप्रिल २०१८ पासून कार्यरत होईल.

आपला अभिलाषी 
शशांक बामनोलकर
(संचालक -सम्यक कलांश प्रतिष्ठान)

Monday 5 February 2018

अभिनय कार्यशाळा


अभिनय कार्यशाळा

सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित

कलाकृती अकादमी - नाट्य प्रशिक्षण

- मार्गदर्शन विषय-
  • १. स्वर साधना
  • २. नृत्य साधना
  • ३. लेखक / दिग्दर्शक / अभिनय
  • ४. रंगभूषा / वेशभूषा
  • ५. लाईट / नेपथ्य
  • ६. वाचिक अभिनय -
अभिनय विषयक -
  • ७. यूज प्रॉप्स
  • ८. काल्पनिक प्रसंग एकेरी / सामूहिक सादरीकरण
  • ९. एकपात्री अभिनय स्वलिखित / गाजलेल्या भूमिका
  • १०. नाट्य प्रसंग बसविणे.
  • ११. वाचिक अभिनय - काव्य , कथा व नाट्य वाचन
  • १२. नऊ रस व त्या आधारे प्रसंग घडविणे.
  • १३. चित्रपट - कॅमेरा समोरील अभिनय व त्याचे तंत्र

वरील विषयान्वे भर देऊन. सलग १५ दिवस आंगिक, वाचिक , आहार्य व सात्विक अभिनयावर भर देणे.

* -विद्यार्थ्यांनसाठी-
  • १. हि कार्यशाळा इतर कार्यशाळेपेक्षा माफक आसेल.
  • २. सदर कार्यशाळेचा कार्यकाळ संपल्या नंतर सहभागी विद्यार्थ्यांना घेऊन नाटक बसविण्यात येईल व त्याचा प्रयोग नाट्यगृहात सादर करण्याची संधी असेल .
  • ३. १५ दिवसीय कार्यशाळे नंतर पुढील २० दिवस नाट्य तालमीचे असेल.
  • ४. विद्यार्थ्यांना घेऊन लघुपट सुद्धा केला जाईल. ५. विद्यार्थांना वर्षभर संस्थेच्या इतर कार्यशाळेसाठी सवलत असेल.

वर्षातून एकच बॅच.. मर्यादित विद्यार्थ्यांसह..