Monday 27 March 2017

।। वंदितो रंगभूमी । वंदितो रंगकर्मी।। नाट्यगंध महोत्सव २०१७ - वर्ष २ रे

।। वंदितो रंगभूमी । वंदितो रंगकर्मी।।

काल दिनांक २६ मार्च २०१७ रोजी जागतिक रंगभूमी दिनाचे निमित्त साधून सम्यक कालांश प्रतिष्ठान ह्या कला प्रचार प्रसार आणि संवर्धन ह्या उद्देशावर आधारित ना नफा ना तोटा ह्या तत्वावर आधारित संस्थेने शाहीर अमर शेख हॉल, विद्यर्थी भवन, बी रोड, चर्चगेट येथे.  नाट्यगंध महोत्सवा आयोजन केले. हे सलग दुसरे वर्ष असून यंदाचा प्रतिसाद देखील छान होता.
ह्या महोत्सवाला सुरुवात सम्यक कलांश प्रतिष्ठान चे अध्यक्ष व नाट्यगंध विभागाचे संचालक व उपसंचालक ह्यांचं हस्ते केली.  स्वरगंध विभागाच्या सुरेल गाणी  संदेश सातव ह्यांच्या काठाला नृत्याच्या आविष्टकरून झाली.  तसेच ह्याला स्पर्धेचे स्वरूप नसून हे सादरीकरणाचे एक व्यासपीठ आहे. ह्या महोत्सवात अभिनयधारा कला संस्था - लागा चुनरी में दाग (लेख - सुनील गिर्हे / दिग्दर्शक - दिग्विजय चव्हाण), रहस्य थिएटर - अनधिकृत (लेख / दिग्दर्शक - ऋणेश तांबे ),
श्री शककरते प्रतिष्ठान - जोखड ( लेख - राजीव जोशी / दिग्दर्शक - प्रयाग दामले ), फर्स्ट शो क्रिएशन - इ. एम. आय. (लेख -  हंबीर बाबर खान / दिगदर्शक - अविनाश भोसले), सुनिद कलामंच - द लव्ह मेहेरबा (लेख / दिग्दर्शक - हर्षल आल्पे) आणि टीम आर - अस्थिकलश (लेख - इरफान मुजावर / दिग्दर्शक - महेंद्र इंगळे) अशा एकांकिका होत्या तसेच नजरे आड राहिलेल्या आणि आपल्या आयुष्याचे अमूल्य योगदान ज्यांनी दिले असे रंगकर्मी ह्यांचा सत्कार सोहळा इथे केला गेला.  यंदाच्या नाट्यगंध महोत्सवाला खास प्रमुख जेष्ठ पत्रकार  व कीर्तनकार श्री. श्यामसुंदर सोन्नर ह्यांची उपस्थिती लाभली. ह्यांच्या हस्ते जेष्ठ रंगकर्मी श्री. सुभाष खरोटे  ज्यांनी अनेक नाटकांना हार्मोनियम च्या सुरांची साथ दिली. अशा आपल्या लाडक्या खरोटे काकांचा सत्कार श्री, श्यामसुंदर सोन्नर ह्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सादर करण्या आलेल्या सर्व संस्थचे स्मुतीचीन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
जागतिक दिनानिमित्त आयोजित ह्या नाट्यगंध महोत्सवाला आलेल्या सर्व सहभागी संस्थेचे, सहकार्य केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे व रंगकर्मींचे शतशः आभार आयोजकांनी मानले व नवीन आगामी उपक्रमांची घोषणाही ह्या महोत्सवाच्या सांगता सोहळ्या करण्यात आली.

















Thursday 16 March 2017

" नाट्यगंध महोत्सव २०१७"

।। वंदितो रंगभूमी । वंदितो रंगकर्मी ।।
सम्यक कलांश प्रतिष्ठान आयोजित 
" नाट्यगंध महोत्सव २०१७"
नजरे आड राहिलेल्या एकांकिकेचा आणि नजरे आड राहिलेल्या रंगकर्मींचा महोत्सव 
दिनांक - २६ मार्च २०१७
वेळ - सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत 
ठिकाण - शाहीर अमर शेख हॉल, विद्यार्थी भवन , बी' रोड, चर्चगेट 
प्रवेश विनामूल्य... 
मर्यादित प्रवेशिकेसाठी संपर्क साधा.  
 अक्षय - ९८६९९९९४०४४