Monday 23 February 2015

सम्यक कलांश प्रतिष्ठान सुरु करत आहोत एक नाट्यप्रवास


रंगदेवता आणो नाट्य रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, 
सम्यक कलांश प्रतिष्ठान सुरु करत आहोत एक नाट्यप्रवास .......



नाट्यगंध



सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध माध्यमातून पुढे एकांकिका आणि प्रायोगिक नाटके पुढच्या काही महिन्यानंतर रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तरी इच्छुक असलेल्या हौशी नाट्य कलाकारांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. ९६६४१५९३४३ -
आपली थोडक्यात माहिती दिलेल्या ई मेल वर पाठवा- samyak.kalansh@gmail.com

Monday 2 February 2015

M.U.S.T. International short film festival 2015 with guest

दिनांक २९ आणि ३० जानेवारी २०१५ रोजी सम्यक कलांश प्रतिष्ठान आणि १०७. ८ must रेडीओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा लघुपट महोत्सव यशस्वी रित्या प्रेक्षकांच्या आणि लघुपट निर्मात्यांच्या मनावर गाजवलं. ह्या लघुपट महोत्सवाची सुरुवात २९ जानेवारी रोजी झाली आणि महोत्सवाचे  उद्घाटन  जेष्ठ निर्माते - दिग्दर्शक किरण शांताराम यांच्या हस्ते झाली.  तसेच त्यांना आयोजित महोत्सवाचे भर भरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . ह्या उपक्रमाचे वैशिष्ट असे होते  कि ,  येथे लघुपट निर्माते आणि प्रेक्षक यांच्यात दिल खुलास संवाद लघुपटा नंतर रंगत होता.  ह्या लघुपट महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय स्थारावरून जवळ पास ५० लघुपट सहभागी झाले त्या पैकी ४४ लघुपट ह्या २ दिवसीय महोत्सवात दाखविण्यात आले. सदर महोत्सवात अनेक लघुपट लोकांना आवडले त्यात अनुकरण आणि बिर्याणी ह्या लघुपटांची छाप खूप वेगळी ठरली. ह्या लघुपट महोत्सवाची सांगता हि सम्यक कलांश प्रतिष्ठानच्या कलाकारांनी  सांकृतिक नृत्य आणि गायन कार्यक्रमाने केली. ह्या कार्यक्रमात गायक म्हणून सुनील शिगवण, विजय गमरे  आणि  काजोल सोनाटते हे तर नृत्य कलाकार साई लाड ,  दुर्वा परब , सिद्धेश सुवारे, तेजाश्विनी करांडे, वैश्वनी जाधव व  त्यांची नृत्य शिक्षिका अश्विनी करांडे तसेच महोत्सवाचे सूत्रसंचालन यशस्वी सांभाळले ते नेहा टिपणीस , राहुल उजगांवकर , अमित जाधव , नयन वाघेला व तांत्रिक सहकार्य लाभले  ते अमित जाधव , नितीन तांबे , निलेश पोतदार आणि किरण सावंत यांच्या सारख्या  तरुण मुलांच्या सहकार्याने हा महोत्सव यशस्वी पार पडला . ह्या महोत्सवा सारखे उपक्रम  पुन्हा व्हावे असे प्रेक्षकांकडून सुचविण्यात आले आहे.