Thursday 28 March 2019

दिनांक २६ व २७ मार्च २०१९ रोजी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त नाट्यगंध महोत्सवाचे

सांस्कृतिक कार्य क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सम्यक कलांश प्रतिष्ठान संस्था विविध उपक्रम आयोजित करते.  असाच एक अभिनव उपक्रम "नाट्यगंध महोत्सव" गेले ३ वर्षे संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले जाते. ज्यात स्पर्धेत नजरे आड राहिलेल्या एकांकिका सादर होतात.  तसेच नजरे आड राहिलेल्या रंगकर्मींचा सत्कार केला जातो .  यंदाच्या वर्षी  सम्यक कलांश प्रतिष्ठान यांनी साठेय महाविद्यालय यांच्या सहयोगाने दिनांक २६ व २७ मार्च २०१९ रोजी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त नाट्यगंध महोत्सवाचे आयोजन साठेय महाविद्यालयात केले. ज्यात ८ नजरे आड राहिलेल्या एकांकिका व नजरे आड राहिलेल्या रंगकर्मींचा सत्कार  करण्यात आला.  ह्या महोत्सवाचे उदघाटन मागील वर्षी सत्कार करण्यात आलेले जेष्ठ हार्मोनियम वादक श्री . सुभाष खरोटे यांच्या हस्ते झाले सादर उद्घाटनास साठेय महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक सौ. जयश्री  गायकवाड , नाट्य विभाग प्रमुख श्री. समीर  जाधव , एन.  एस. एस.  विभाग प्रमुख गौतम म्हस्के  सह सम्यक कलांश प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष श्री शशांक बामनोलकर उपस्थित होते. पहिल्या दिवशी १२ चे  यांचे चक्रव्यूव्ह , मा.वे.दे .  हरिया महाविद्यालय, शहाड  - हृदयस्पर्श ,इम्पिरिअल फाऊंडेशन - लेणी व चेतन टेमबुर्णीकर याचे मंटो यावर एकपात्री सादर झाले.  तसेच महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी टॅलेंट हंट एंटरटेनमेंट - बायो मॅट्रिक , नवे पर्व - मिरज दंगल ,मुक्त छंद - जीर्णधार व प्राण थिएटर - एका रबराची गोष्ट सादर झाल्या.  महोत्सवाची सांगता करताना सत्कारमूर्ती  रंगभूषाकर श्री . वामन गमरे ,  रंगकर्मी श्री. चंद्रशेखर मेस्त्री  आणि जेष्ठ रंगकर्मी व अनेक नाटकाचे सूत्रधार श्री. प्रभाकर ( गोट्या ) सावंत ह्यांचा सत्कार तरुण नाट्य तरुण नाट्य निर्माते ( अद्वैत थिएटर)/ नाट्य निर्माते संघाचे प्रमुख कार्यवाहक श्री . राहुल भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.  अशा दिगज्जांच्या हस्ते सहभागी संघा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले व नाट्यगंध महोत्सवाची सांगता करण्यात आली .