Wednesday 10 February 2016

नाट्यगंध महोत्सव (Natyagandh Mahotsav)



नाट्यगंध महोत्सव 
सम्यक कलांश प्रतिष्ठान अयोजोजित नाट्यगंध महोत्सवाचे नियम व अटी आणि  अर्जासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा .
                         
                                                               
Natyagandh Mahotsav Form click on me







नमस्कार , 

 यंदाच्या नाट्यगंध महोत्सव ह्या नव्या उपक्रमात मर्यादित प्रवेश असल्या कारणाने आपल्या संघाची नाव नोंदणी झाली आहे कि नाही ह्याची. कृपया नाव नोंदणी भ्रमण ध्वनी द्वारे करावी .  (नाव नोंदणी साठी - आपल्या संघाचे / संस्थेचे नाव , एकांकिकेच नाव , संघ प्रमुखाचे नाव , संपर्क क्रमांक व ईमेल आय डी द्यावा .) आपले नाव नोंदणी गरजेची असून आपण त्वरित नाव नोंदणी करावी . तसे न झाल्यास आपण महोत्सवात सहभागी नाही होऊ शकत ह्याची नोंद घ्यावी.( नाट्यगंध महोत्सवाच्या प्रवेश मर्यादेमुळे इतर गरजू कलाकार संघ मागे राहणार नाही. आपण ह्याची  कृपया दक्षता घ्यावी .)  

* आपली नाव नोंदणी झाली असेल तर ती पुन्हा पडताळून घ्यावी . तसेच २८ फेब्रु. २०१६ रोजी आयोजित मिटिंग ला उपस्थित राहावे .  अधिक महोत्सवाच्या माहितीसाठी खालील संकेत स्थळी भेट द्यावी . www.samyakkalansh.blogspot.com / www.samyakkalansh.jimdo.com  
* आपले सहकार्य गरजेचे आहे. 

 नाव नोंदणी साठी खालील नंबरावर संपर्क साधावा - 
अक्षय - ९८६९९९४०४४




आपला नम्र 
नाट्यगंध महोत्सव आयोजक



-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार,

       सम्यक कलांश प्रतिष्ठान हि संस्था सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असते . नृत्य , नाट्य आणि संगीत विभाग पद्धतीने कार्यक्रम आयोजित करत असून तरुण हौशी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच काम आणि सांस्कृतिक कलेचा वारसा जतन करण्याचे काम संस्थे मार्फत होते. हि संस्था वेग वेगळे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आयोजित करते. नाताळच्या सुट्टीत हरवत चालेल्या कळसूत्री बाहुल्याची कार्यशाळा सदर संस्थे शासकीय महाविद्यालाशी सहकार्याने होऊन आयोजित केली. त्यात तरुण व वयस्कर असलेल्या विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
  
     यंदा असाच एक आगळा वेगळा उप्रकम सम्यक कलांश प्रतिष्ठान हि संस्था घेवून येत आहे . संस्थे अंतर्गत असलेल्या नाट्य विभाग ( नाट्यगंध ) "नाट्यगंध महोत्सव'' हा नाट्य महोत्सव आयोजित करत आहे. येत्या रंगभूमी दिना निमित्त दिनांक २७ मार्च आणि २८ मार्च रोजी शाहीर अमरशेख हॉल, चर्चगेट  मुंबई येथे  आयोजित करण्याचे योजिले आहे. सदर महोत्सवात अशा एकांकिकांचा लाभ प्रेक्षकांना मिळणार आहे. ज्या आजवर कोणत्याही स्पर्धा जिंकलेली नसावी किंवा अंतिम फेरीत पोहोचलेली नसावी. स्पर्धेत मागे राहिलेल्या कलाकृती प्रेक्षकांन पर्यंत पोहचविण्याचा आणि त्या एकांकिकेला लोकांपर्यंत पोहचविण्याचे व्यासपीठ हा  महोत्सव ठरणार आहे . तसेच असे काही रंगभूमी सेवक ज्यांनी अनेक वर्ष आपल्या कामातून रंगभूमीची सेवा केली. त्या रंगभूमी सेवकांचा सत्कार ह्या महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते कार्यात येणार आहे . ह्या महोत्सवाचे वैशिष्ठ असे कि ह्या आयोजनात सर्व तरुण कलाकार असून रंगभूमी वर हा महोत्सव आजवरचा वेगळा कार्यक्रम ठरेल असे वाटे . सदर महोत्सव बद्दल आधी माहिती हवी असल्यास सम्यक कलांश प्रतिष्ठानच्या ब्लोग वर ती आपणास उपलब्ध होईल.

 तसेच आपल्याला देखील ह्या महोत्सवाचा एक भाग बनायचा असेल तर आपल नाव व आपला संपर्क क्रमांक खाली देलेल्या ई-मेल आय.डी वर पाठवा. Email - natyagandh@gmail.com