Sunday 27 March 2016

२७ मार्च २०१६ हा जागतिक रंगभूमी दिन "नाट्यगंध महोत्सव"

२७ मार्च २०१६ हा जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी रंगभूमी हि मराठी माणसाच्या संस्कृतीतील एक विभाज्य भाग, नव नवीन प्रयोग व उपक्रम  मसातत्याने मराठी रंगभूमीवर घडत असतात. असाच एक अभिनव उपक्रम २७ मार्च २०१६ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजे पर्यंत , शाहीर अमर शेख हॉल , विद्यार्थी  भवन , चर्चगेट येथे  सम्यक कलांश प्रतिष्ठान आणि शासकीय विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "नाट्यगंध महोत्सवात" झाला. गेल्या वर्षभरात स्पर्धेत अंतिम विजेते न झालेल्या व  नजरे आड राहिलेल्या एकांकिका ह्या महोत्सवात प्रेक्षकांना विनामुल्य दाखविण्यात आल्या . चांगल्या कलाकृती स्पर्धात्मक शर्यतीत काही शुल्लक कारणाने मागे राहत त्यामुळे बरेच कलाकारांचे खचीकरण  होते.  ते खचीकरण थांबविण्यासाठी, तसेच त्या कलाकारांना हक्काचं व्यासपीठ महोत्सवाद्वारे देण्यात आले. एकांकिका सादर झाल्या नंतर तो संघ आणि प्रेक्षक यांच्यात परिसंवाद ठेवण्यात आले. असा प्रयोग पहिल्यांदाच नाट्य महोत्सवात झाला व त्याची सर्व कलाकारांनी तसेच प्रेक्षकांनी भरगोस स्तुती केली . ह्या महोत्सवात जिद्द (अभिनयधारा, मुंबई ) , बेडूक रमी आणि तुम्ही (कलायात्री, डोंबिवली), दाभोलकरांना दिसलेलं भूत (नाट्यगंध, पुणे ) , तीन चोर एक पोळी व एक बेंच (फस्ट शो क्रियेशन, भांडूप) आणि अभंग (टीम आर, ठाणे )असे  ५ एकांकिका व प्रेमानंद गज्वी लिखित २ अंकी नाटक देवनवरी चा विशेष प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळाला . नजरे आड कलाकृती प्रमाणे नजरे आड राहिलेल्या रंगभूमी सेवकांचा सत्कार सोहळा महोत्सवात यशस्वी पार पडला. श्री. प्रभाकर म्हसकर ( जेष्ठ  दिग्दर्शक), श्री . अशोक पालेकर (जेष्ठ नेपथ्यकार) व श्री. चंदर पाटील ( रंगभूषाकार) अशा दिग्गज रंगभूमी सेवकांचा सत्कार झी वाहिनी चे वरिष्ठ कार्यकारी निर्माते श्री . निलेश मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले.  आयुष्याची बरीच मोठी कारकीर्द असून स्वताचा कुठेही गाजा-वाजा  न करणारी मंडळी ह्यांचा हा सत्कार सोहळा होता . सत्कार मूर्तीच्या हस्ते सहभागी एकांकिका संघाना स्मृतीचींह व प्रमाण पत्र देण्यात आले . सर्व प्रेक्षक , कलाकार , मान्यवर तसेच सत्कारमूर्ती ह्यांनी ह्या महोत्सवाची भरगोस स्तुती केली. तसेच हा महोत्सव आणखी मोठ्या स्वरुपात व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याला आयोजकांनी साकारांत्मक प्रतिसाद दिला . तसेच महोत्सव यशस्वी करण्यात मोलाचा वाट असणाऱ्या सर्व सहभागी संघांचे, प्रेक्षकांचे तसेच मान्यवरांचे आभार मानले .'

























Saturday 12 March 2016

नाट्यगंध महोत्सव .. नक्की या.

सम्यक कलांश प्रतिष्ठान आयोजित "नाट्यगंध महोत्सव"


नमस्कार , 
येत्या २७ मार्च २०१६ रोजी जागतिक रंगभूमी दिन निमित्त सम्यक कलांश प्रतिष्ठान आणि शासकीय विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "नाट्यगंध महोत्सव" आयोजित केला असून सदर महोत्सवात लोकांच्या नजरे आड राहिलेल्या कलाकृती महोत्सवातून लोकां पर्यंत पोहचविण्याचा महोत्सवाद्वारे करणार आहोत .५ विविध विषयावर आधारित  एकांकिका सदर होणार असून प्रेमानंद गज्वी लिखित २ अंकी देवनवरी  नाटकाचा विशेष प्रयोग होणार आहे . सर्व नाट्य  रसिकांनी ह्याचा लाभ घ्यावा हि विंनती . तसेच रंगभूमी वर कार्यरत असून नजरे आड राहिलेल्या रंगभूमी सेवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे . हा महोत्सव विनामुल्य असून प्रेक्षकांचा अमुल्य उपस्थिती गरजेची आहे . 
सदर महोत्सवात आपण पण सहभागी नक्की व्हा . 
"नाट्यगंध महोत्सव"
दिनांक - २७ मार्च २०१६
वेळ - सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजे पर्यंत 
ठिकाण - शाहीर अमर शेख सभागृह , विद्यार्थी भवन , ''बी'' रोड , चर्चगेट , मुंबई 
प्रवेश विनामुल्य 

संपर्क - अक्षय :- ९८६९९९४०४४

धन्यवाद ! 

आपला नम्र 
सम्यक कलांश प्रतिष्ठान