Friday 24 August 2018

*|| नानारुचि रसिकां दे केवळ नाटक पुरें समाधान ।।*



*|| नानारुचि रसिकां दे केवळ नाटक पुरें समाधान ।।*
*- कविकुलगुरु कालिदास*
प्रति,
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
*विषय- आपल्या गणशोत्सव मंडळात नाटक सादर करण्याची संधी उपलब्ध करुन देण्याबाबत.*
महोदय/महोदया,
सम्यक कलांश प्रतिष्ठान गेले ९ वर्ष सांस्कृतिक कार्य क्षेत्रात कार्यरत आहे. कला संवर्धन, जतन व प्रसार या उद्देशाने नृत्य, गायन आणि नाटक अशा विविध माध्यमांतून सांस्कृतिक उपक्रम संस्था यशस्वीरित्या राबवत आहे.
‎आपले मंडळ स्थानिक लोकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. आपण मराठी भाषेचा प्रसार आणि संवर्धन करीत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या महाराष्ट्राला लोककलेचा खुप मोठा वारसा लाभला आहे. समाजात एकोपा निर्माण व्हावा आणि समाजप्रबोधन व्हावे या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. आज आपले मंडळ ह्या कार्यात मोलाचे योगदान देत आहे. उपरोक्त संस्था सम्यक कलांश प्रतिष्ठान लोकनाट्याचे जतन व्हावे या उद्देशाने *'बिन बाईचा राजवाडा'* या नाटकाचे प्रयोग करीत आहे. सदर नाटक बुवाबाजी या विषयावर आधारित असून त्यावर कलाकारांनी विनोदी ढंगाने खुमासदार भाष्य केले आहे.
‎आपल्या मंडळाद्वारे तेथील स्थानिक प्रेक्षकांसाठी आम्ही सदर नाटकाचा प्रयोग माफक मानधनात करू इच्छितो. तरी आपण या नाटकाचा प्रयोग आपल्या मंडळात सादरकरण्याची करण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी, हि नम्र विनंती.
जर आपण प्रयोग पाहण्यासाठी इच्छुक असाल तर आम्हाला कळवा, मुंबईत होणाऱ्या ऑगस्ट महिन्यातील प्रयोगा विषयक आम्ही आपणास कळवू.
संपर्क : +919821711462 / 9664159343
‎ आपला अभिलाषी,
‎ *शशांक बामनोलकर*
( लेखक / दिग्दर्शक - बिन बाईचा राजवाडा)