Thursday 28 July 2016

त्येक सणात आणि प्रत्येक क्षणात आनंद द्विगुणित करायला मनोरंजन


😊
प्रत्येक सणात आणि प्रत्येक क्षणात आनंद द्विगुणित करायला मनोरंजन लागत आणि त्या मनोरंजनाचं साधन हे कलेचं असत. असाच तुम्हा सर्व प्रेक्षकांचा येत्या गणपतीच्या सणाचा आनंद द्विगुणित करायला सम्यक कालांश प्रतिष्ठान सज्ज आहे. सम्यक कालांश प्रतिष्ठान ह्या सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या संस्थेचे ३ विभाग स्वरगंध , नृत्यगंध आणि नाट्यगंध चे खास कार्यक्रम आम्ही आपल्या समोर मांडत आहोत. आपल्या पैकी कोणालाही ह्या खाली दिलेल्या कार्यक्रमाचा प्रयोग आपल्या मंडळात आयोजितअसेल. तर दिलेल्या क्रमांकावर त्वरित संपर्क साधा. 😊 😍 😘

स्वरगंध 🎤🎼(संगीत विभाग ) प्रस्तुत "स्वरामृत" ( भक्ती संगीताचे कार्यक्रम) - 📞८४५२८७५३९०

नृत्यगंध 👯💃🏻(नृत्य विभाग) प्रस्तुत "नाद घुंगरांचा " (लावणी नृत्य कार्यक्रम) व "कला अविष्कार " (मराठी लोक नृत्य कार्यक्रम ) - 📞९७७३०९९१५४

नाट्यगंध 😜🎭 (नाट्य विभाग) प्रस्तुत "वस्त्रहरण झालं का ?"(धमाल विनोदी लोकनाट्य) 📞८८२८४५२०५५

Monday 25 July 2016

सम्यक कालांश प्रतिष्ठान अंतर्गत शाहिरी पथक


नमस्कार,
             सम्यक कालांश प्रतिष्ठान ह्या संस्थेने आजवर सांस्कृतिक कलेचा वारसा जपत आहे व पुढेही जपत राहील. त्यासाठी अनेक उपक्रम सुरु केले गेले. नवोदित कलाकारांना अनेक व्यासपीठ दिले.
             महाराष्ट्र हा लोककलेकचा परिपूर्ण संपत्तीचा खजिना असलेला राष्ट्र हा महाराष्ट्र आहे.  विविध कला गुणांनी संपन्न अश्या महाराष्ट्राला  मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जेव्हा  एल्गार करावा लागा. तेव्हा महाष्ट्रातल्या शाहिरांनी आपल्या पथकातून हि चळवळ पुढे नेहण्यात मोठा वाटा उचलला होता. शाहिर आत्माराम पाटील , शाहिर गव्हाणकर, शाहिर अमर शेख आणि शाहीर अण्णा भाऊ साठे ह्यांची शाहिरी पथके ह्यांनी हा लढा सर्वसामान्य पर्यंत पोहचवून त्यांना ज्वलंत केलं. असा शाहिरी पथक आज खरंतर नाहिसा झाला म्हणण्यास. काही हरकत नाही. गल्ली गोळ्यात ढोल- पथक सुरु झाली पण शाहिरी पथक हरवत गेलेली.  मराठी लोककलेला जिवंत ठेवणारी फळी हरवत गेली.
                       हिच उणीव आणि खंत आपल्या परीने कशी भरात येईल ह्याची गेले २-३ वर्षे वाट पाहत होतो. बरेच तरुण मुले लोककलेचा प्रशिक्षण घेतात काहींना तर तो घरगुती वारसा मिळतो. पण प्रत्येक्षात ह्याचा वापर होणार कसा प्रश्न हल्लीच्या ह्या तरुणाई ला पडतो अशा तरुण हौशी - शिक्षित (लोककला शिक्षित) कलाकारांसाठी सम्यक कालांश प्रतिष्ठान अंतर्गत शाहिरी पथक सुरु करत आहोत . हरवत चालली लोककला आणि कमी पडत असलेला तरुण शाहिरीचा रंग हा विचार करून हे पथक मुंबईत सुरु करत आहोत. इच्छुक कलाकारांनी दिलेल्या ईमेल वर मेल करा. 

Wednesday 20 July 2016

puppets workshops

Hello!
Like all other projects of Samyak kalansh pratishthan ,we are starting a new project. Along with swargandha, nrutyagandha, and natyagandha , we are introducing puppets workshops.Young students (age 16-22) can be a part of this new project. In this project ,we will teach the participants to make puppets and they would be allowed to participate in the puppets show organised by Samyak kalansh pratishthan. Interested students please send your entries to

email - natyagandh@gmail.com/Samyak.kalansh@gmail.com


नमस्कार,
सम्यक कालांश प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमा प्रमाणे नाव उपक्रम सुरू केला आहे. स्वरगंध, नृत्यगंध आणि नाट्यगंध प्रमाणे सम्यक कालांश प्रतिष्ठान अंतर्गत कळसूत्री बाहुल्यांचा (पी. पपेट्स ग्रुप) विभाग सुरू केला आहे. ज्यात तरुण मुल-मुली सहभागी (वय वर्ष १६ ते २२ ) होऊ शकतात. ह्या विभाग अंतर्गत तरुण मुल-मुली ह्यांना कसूत्री बाहुल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल व ते कलाकार पुढील कळसूत्री बाहुल्यांच्या कार्यक्रमात व कार्यशाळेत सहभागी केले जातील. इच्छुक तरुण कलाकारांनी खाली दिलेल्या ई-मेल वर आपली माहिती पाठवून द्यावी.
सूचना - सहभागी इच्छुक असणारे कलाकार मुंबईतील असावे .
email - natyagandh@gmail.com / samyak.kalansh@gmail.com
#puppets #rajasthanipuppets #westernpuppets #teachpuppets #puppetsworkshop #samyakkalansh





Thursday 14 July 2016

पस्थित राहिलेल्या फिल्म मेकर व सदिच्छा व्यक्त केलेल्या सर्व रसिक प्रेक्षांचे मनपूर्वक आभार !!!!!

पस्थित राहिलेल्या फिल्म मेकर व सदिच्छा व्यक्त केलेल्या सर्व रसिक प्रेक्षांचे मनपूर्वक आभार !!!!!
सम्यक कलांश प्रतिष्ठान आणि १०७.८ मस्ट रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ वा मस्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल ११ जुलै ते १३ जुलै २०१६ रोजी मुंबई विद्यापीठ (कालिना कॅम्पस) येथे पार पडला. तीन दिवस आयोजित ह्या महोत्सवात सामाजिक विषयांवर आधारित भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय लघुपट दाखविण्यात आले. लंडन , रशिया, मॉस्को सारखे देशातील, यु. पी. , आसाम, तेलंगणा , केरळ , तामिळनाडू सारख्या राज्यातून तसेच कोल्हापूर , लातूर , औरंगाबाद , पुणे , ठाणे व मुंबई सारख्या वेग वेगळ्या शहरातून शॉर्ट मेकरच्या शॉर्ट फिल्मस दाखविण्यात आले.सदर फेस्टिवल मध्ये ५० शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये दाखविण्यात आले . प्रत्येक शॉर्ट फिल्म दाखविल्या नंतर त्या शॉर्ट फिल्म मेकर सोबत प्रेक्षकांचा खुला शॉर्ट फिल्म विषयी संवाद ठेवण्यात आले. तसेच फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी शॉर्ट फिल्म मेकर आणि प्रेक्षक ह्यांच्यात चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी "सखे ताक पुढचं पाऊल " ह्या मालिकेतील शर्मिला शिंदे (रुपाली) , सिने अभिनेता अनिल मांगे आणि सिने दिग्दर्शक मयूर तांबे ह्यांची उपस्थिती लाभली. तसेच रंगभूमी वर आलेले नाटक "आमची मुंबई " ह्या नाटकाची टीम ह्यांनी देखील आपली उपस्थिती फेस्टिवल मध्ये दर्शविली. एक अनोखा असा अभिनव उपक्रम हौशी आणि अनुभवी शॉर्ट फिल्म मेकरला हक्काचं व्यासपीठ देणारा फिल्म फेस्टिवलच्या विश्वात घडला असावा. गेले ५ वर्ष फेसाबुकं सारख्या प्रसार माध्यमातून ह्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलला भरगोस प्रतिसाद मिळत आहे. तरुण मंडळींचा सहभाग असलेला सम्यक कालांश प्रतिष्ठान आणि १०७.८ मस्ट रेडिओच्या अनोख्या उपक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या अभिप्रायातून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या .