Thursday 14 July 2016

पस्थित राहिलेल्या फिल्म मेकर व सदिच्छा व्यक्त केलेल्या सर्व रसिक प्रेक्षांचे मनपूर्वक आभार !!!!!

पस्थित राहिलेल्या फिल्म मेकर व सदिच्छा व्यक्त केलेल्या सर्व रसिक प्रेक्षांचे मनपूर्वक आभार !!!!!
सम्यक कलांश प्रतिष्ठान आणि १०७.८ मस्ट रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ वा मस्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल ११ जुलै ते १३ जुलै २०१६ रोजी मुंबई विद्यापीठ (कालिना कॅम्पस) येथे पार पडला. तीन दिवस आयोजित ह्या महोत्सवात सामाजिक विषयांवर आधारित भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय लघुपट दाखविण्यात आले. लंडन , रशिया, मॉस्को सारखे देशातील, यु. पी. , आसाम, तेलंगणा , केरळ , तामिळनाडू सारख्या राज्यातून तसेच कोल्हापूर , लातूर , औरंगाबाद , पुणे , ठाणे व मुंबई सारख्या वेग वेगळ्या शहरातून शॉर्ट मेकरच्या शॉर्ट फिल्मस दाखविण्यात आले.सदर फेस्टिवल मध्ये ५० शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये दाखविण्यात आले . प्रत्येक शॉर्ट फिल्म दाखविल्या नंतर त्या शॉर्ट फिल्म मेकर सोबत प्रेक्षकांचा खुला शॉर्ट फिल्म विषयी संवाद ठेवण्यात आले. तसेच फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी शॉर्ट फिल्म मेकर आणि प्रेक्षक ह्यांच्यात चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी "सखे ताक पुढचं पाऊल " ह्या मालिकेतील शर्मिला शिंदे (रुपाली) , सिने अभिनेता अनिल मांगे आणि सिने दिग्दर्शक मयूर तांबे ह्यांची उपस्थिती लाभली. तसेच रंगभूमी वर आलेले नाटक "आमची मुंबई " ह्या नाटकाची टीम ह्यांनी देखील आपली उपस्थिती फेस्टिवल मध्ये दर्शविली. एक अनोखा असा अभिनव उपक्रम हौशी आणि अनुभवी शॉर्ट फिल्म मेकरला हक्काचं व्यासपीठ देणारा फिल्म फेस्टिवलच्या विश्वात घडला असावा. गेले ५ वर्ष फेसाबुकं सारख्या प्रसार माध्यमातून ह्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलला भरगोस प्रतिसाद मिळत आहे. तरुण मंडळींचा सहभाग असलेला सम्यक कालांश प्रतिष्ठान आणि १०७.८ मस्ट रेडिओच्या अनोख्या उपक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या अभिप्रायातून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या .

No comments:

Post a Comment