Monday 25 July 2016

सम्यक कालांश प्रतिष्ठान अंतर्गत शाहिरी पथक


नमस्कार,
             सम्यक कालांश प्रतिष्ठान ह्या संस्थेने आजवर सांस्कृतिक कलेचा वारसा जपत आहे व पुढेही जपत राहील. त्यासाठी अनेक उपक्रम सुरु केले गेले. नवोदित कलाकारांना अनेक व्यासपीठ दिले.
             महाराष्ट्र हा लोककलेकचा परिपूर्ण संपत्तीचा खजिना असलेला राष्ट्र हा महाराष्ट्र आहे.  विविध कला गुणांनी संपन्न अश्या महाराष्ट्राला  मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जेव्हा  एल्गार करावा लागा. तेव्हा महाष्ट्रातल्या शाहिरांनी आपल्या पथकातून हि चळवळ पुढे नेहण्यात मोठा वाटा उचलला होता. शाहिर आत्माराम पाटील , शाहिर गव्हाणकर, शाहिर अमर शेख आणि शाहीर अण्णा भाऊ साठे ह्यांची शाहिरी पथके ह्यांनी हा लढा सर्वसामान्य पर्यंत पोहचवून त्यांना ज्वलंत केलं. असा शाहिरी पथक आज खरंतर नाहिसा झाला म्हणण्यास. काही हरकत नाही. गल्ली गोळ्यात ढोल- पथक सुरु झाली पण शाहिरी पथक हरवत गेलेली.  मराठी लोककलेला जिवंत ठेवणारी फळी हरवत गेली.
                       हिच उणीव आणि खंत आपल्या परीने कशी भरात येईल ह्याची गेले २-३ वर्षे वाट पाहत होतो. बरेच तरुण मुले लोककलेचा प्रशिक्षण घेतात काहींना तर तो घरगुती वारसा मिळतो. पण प्रत्येक्षात ह्याचा वापर होणार कसा प्रश्न हल्लीच्या ह्या तरुणाई ला पडतो अशा तरुण हौशी - शिक्षित (लोककला शिक्षित) कलाकारांसाठी सम्यक कालांश प्रतिष्ठान अंतर्गत शाहिरी पथक सुरु करत आहोत . हरवत चालली लोककला आणि कमी पडत असलेला तरुण शाहिरीचा रंग हा विचार करून हे पथक मुंबईत सुरु करत आहोत. इच्छुक कलाकारांनी दिलेल्या ईमेल वर मेल करा. 

No comments:

Post a Comment