Wednesday 6 August 2014

सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित "स्वरामृत" ताल तरुणाईचा , स्वर तरुणाईचा...



सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित "स्वरामृत" ताल तरुणाईचा , स्वर तरुणाईचा...



   दिनांक १४ ऑगस्ट २०१४ रोजी सायं. ४ वाजता …. पु .ल. देशपांडे कला अकादमी हॉल, रवींद्र नाट्यमंदिर , प्रभादेवी , दादर येथे … सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित "स्वरामृत" हा गायनाचा क़र्यक्रम ठेवण्यात आला आहे. तरुण गायक आणि त्यांना साथ देणारे तरुण वादक यांना एकत्र करून सदर मराठी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने मराठी गायन क्षेत्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीने स्वरांची एक मेजवानी रसिक श्रोत्र्यांना अनुभवायला मिळेल एवढे मात्र नक्की … आपणही हा अनुभव घेण्यासाठी नक्कीच या ...












१४ ओगस्ट २०१४ रोजी आयोजित करण्यात आलेला स्वतंत्र दिना निमित्त मराठी गीतांचा संगीतमय कार्यक्रम स्वरामृत  यशस्वी रित्या पु.ल. देशपांडे कला अकादमी हॉल, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, दादर येथे पार पडला.  सदर कार्यक्रमात सर्व तरुण गायक आणि तरुण वादक यांनी रसिक श्रोत्यांना मंत्र मुग्ध केले. ह्या  कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून     
रायगड भूषण  मृदुंग  वादक  माननीय  श्री  पांडुरंग  घाडगे  उर्फ  बंदराज  महाराज  त्यांचे  सगळे  शिष्य  त्यांना  माउली  म्हणतात  तसेच  त्यांना  इतर हि  बरच  पारितोषिक  मिळाले  आहेत.  त्याच  बरोबर  आई  भवानी  महाराष्ट्र  लोकसेवा  संघटनेचे  अध्यक्ष  श्री  अभिजित  पवार  हेही उपस्थित  होते  यांच्या  सघटने  मार्फत  बरीच  समाज  सेवेची  काम  केली  जातात.  ते  खास  वापी, गुजरातहून  ह्या  कार्यक्रमासाठी  उपस्थित  झाले  होते.  गुरु  श्री  बंदराज  महाराज  यांचे  जवळचे  शिष्य  आणि  त्यांच्या  प्रत्यक  गोष्टींचा  कार्यभार  सांभाळणारे  त्यांचे   विश्वासू  श्री  अभिजित  देसाई  हे  हि  उपस्थित  होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी गायकांना , वादकांना तसेच संपूर्ण कार्यक्रमाची भर-भरून स्तुती केली.    
सुनील, प्रीती, संदीप,योगेश,  विजय, प्राची , प्रज्ञा , स्वप्नील , कारण ह्या गायकांनी तर वैभव, संकेत, अनिकेत, विपुल, संजय आणि मंदार ह्या वादकांनी आपल्या कलेची मैफिल आणखी फुलवली.  तसेच जमलेल्या प्रेक्षक वर्गानी सम्यक कलांश प्रतिष्ठानच्या पुढील प्रवासाठी शुभेच्छा दिल्या .