Saturday 25 February 2017

नाट्यगंध महोत्सव २०१७


सम्यक कलांश प्रतिष्ठान (रजि . ) आयोजित
नाट्यगंध महोत्सव २०१७ - वर्ष २ रे
उद्दिष्ट - ) स्पर्धेच्या काळात मागे राहिलेल्या एकांकिका प्रेक्षकांपर्यंत आणण्याचा.
            ) आपल्या कामातून रंगभूमीची सेवा करणारे नजरे आड राहिलेल्या रंगकर्मींचा सत्कार सोहळा.
            नियम अटी
) नाट्यगंध महोत्सव स्पर्धा नसून सादरीकरणाचे व्यासपीठ आहे. ह्याची नोंद घ्यावी.
) सहभागी एकांकिका मराठी असावी. एक दिवसीय महोत्सव असल्याने मर्यादित एकांकिका महोत्सवात स्वीकारण्यात येणार आहेत. एकांकिका प्रवेश शुल्क रु.५००/- .
) अश्लील विनोद किंवा सामाजिक भावना दुखावल्या जाणार नाही ह्याची सर्वस्व जबाबदारी संस्थेने पाळावी ह्यास आयोजक जबाबदार राहणार नाही.        
) सहभागी एकांकिका संघ मागील वर्षभरात कोणत्याही एकांकिका स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचलेला किंवा अंतिम फेरी जिंकलेला नसावा.
) नाट्यगंध महोत्सव स्पर्धा नसल्यामुळे येथे बक्षिसे किंवा कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही. पण प्रत्येक संघास प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह दिले जाईल.
) मुंबईतील किंवा मुंबई बाहेरील संघास प्रवास भत्ता दिला जाणार नाही. तो संघाने स्व: खर्चाने करावा.
) एकांकिकेचा कालावधी ३० ते ४५ मिनिटे असेल. तसेच उर्वरित १५ मिनिटे रंगमंच तयारीला दिला जाईल असेल संपूर्ण एक तास प्रत्येक संघास दिला जाईल.
) आयोजकांकडून देण्यात येणारे साधारण :-
       लाईट्स मध्ये - पार , स्पॉट, पॉवर बॅक दिले जाईल.
        नेपथ्य  - लेव्हल , ठोकळे दिले जातील.
 ह्यावरील व्यवस्था संघाने स्वत: करावी. (वेशभूषा आणि रंगभूषा संघाची असेल. )
) नाट्यगंध महोत्सवात सहभागी संघाने महोत्सवाच्या अर्ज सोबत प्रवेश शुल्क रु.५००/-, एकांकिकेची संहिता, नेपथ्य आराखडा, सेन्सॉर प्रमाणपत्र किंवा पावती, लेखक सहमती पत्र (प्रत्येकी ३ प्रत), कलाकार व तंत्र ज्ञानाची यादी आणि संघाचा मागील वर्षभरात सादर केल्या स्पर्धेचा सहभागाबद्दल थोडक्यात लिखित माहिती आयोजकांकडे दिलेल्या दिवशी / वेळेत सुपूर्त करावे.
टीप - सहभागी इच्छुक संघाने आपली नाव नोंदणी पूर्वी संपर्क / महोत्सव प्रमुखांशी संपर्क साधावा.इतर कोणत्याही व्यक्तीस तसे अधिकार दिले गेले नाही ह्याची नोंद घ्यावी.  

संपर्क -
अक्षय जोष्टे - +९१ ९८६९९९४०४४

एकांकिकेची मर्यादा पूर्ण झाल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

नाट्यगंध महोत्सव २०१७ अर्जासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा

Sunday 19 February 2017

आवाजाची कार्यशाळा












आजवर विविध सांस्कृतिक उपक्रमातून सम्यक कलांश प्रतिष्ठान आपलं नाव राखून आहे. कला प्रचार, प्रसार व संवर्धन ह्या उदिष्ठाने ना नफा ना तोटा या तवावर तत्पर राहून  दिनांक १२ आणि १९ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ८ ते १२ वाजे पर्यंत सम्यक कालांश प्रतिष्ठान अंतर्गत स्वरगंध विभाग आयोजित आवाजाची कार्यशाळा हल्लीच पु.ल देशपांडे अकादमी, प्रभादेवी, दादर येथे यशस्वी पार पडली. सादर कार्यशाळेचे मार्गदर्शक हे प्रशिक्षक विशारद श्री. सचिन मोरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सहभागी विद्यार्थ्यंना मिळाले. प्रत्येयदर्शी प्रशिक्षण ह्या कार्यशाळेचे वैशिष्ट्य होते. तब्बल २५ विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणावरून ह्याचा लाभ घेण्यास आले. वयोमर्यादा नसल्यामुळे लहान ते थोर विद्यार्थांचा सहभाग अग्रेसर होता. स्वरगंध विभागाचे संचालक तसेच सम्यक कलांश प्रतिष्ठानचे सचिव श्री. सुनील शिगवण यांच्या उत्तम व्यवस्थान अत्यंत महत्वाचे ठरले. पुढे हि कार्यशाळा अशीच सुरु राहील व वेग वेगळ्या ठिकाणी त्याचे आयोजन होणार असेल असे ह्या कार्यशाळेच्या सांगता समारोहात सांगण्यात आले.