Sunday 19 February 2017

आवाजाची कार्यशाळा












आजवर विविध सांस्कृतिक उपक्रमातून सम्यक कलांश प्रतिष्ठान आपलं नाव राखून आहे. कला प्रचार, प्रसार व संवर्धन ह्या उदिष्ठाने ना नफा ना तोटा या तवावर तत्पर राहून  दिनांक १२ आणि १९ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ८ ते १२ वाजे पर्यंत सम्यक कालांश प्रतिष्ठान अंतर्गत स्वरगंध विभाग आयोजित आवाजाची कार्यशाळा हल्लीच पु.ल देशपांडे अकादमी, प्रभादेवी, दादर येथे यशस्वी पार पडली. सादर कार्यशाळेचे मार्गदर्शक हे प्रशिक्षक विशारद श्री. सचिन मोरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सहभागी विद्यार्थ्यंना मिळाले. प्रत्येयदर्शी प्रशिक्षण ह्या कार्यशाळेचे वैशिष्ट्य होते. तब्बल २५ विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणावरून ह्याचा लाभ घेण्यास आले. वयोमर्यादा नसल्यामुळे लहान ते थोर विद्यार्थांचा सहभाग अग्रेसर होता. स्वरगंध विभागाचे संचालक तसेच सम्यक कलांश प्रतिष्ठानचे सचिव श्री. सुनील शिगवण यांच्या उत्तम व्यवस्थान अत्यंत महत्वाचे ठरले. पुढे हि कार्यशाळा अशीच सुरु राहील व वेग वेगळ्या ठिकाणी त्याचे आयोजन होणार असेल असे ह्या कार्यशाळेच्या सांगता समारोहात सांगण्यात आले. 


No comments:

Post a Comment