Saturday 10 June 2017

१७ जूनला सज्ज आहे. दुपारी १ वाजता... भरत नाट्यमंदिर, पुणे.

नमस्कार,
।। वंदीतो रंगभूमी। वंदितो रंगकर्मी।।
सांगण्यास आनंद होत आहे कि, येत्या १७ जून २०१७ रोजी दुपारी १ वाजता.. भरत नाट्यमंदिर - पुणे येथे. सम्यक कलांश प्रतिष्ठान व मॅजिक मीडिया यांच्या सहयोगाने 
नाट्यगंध थिएटर पुणे प्रस्तुत शशांक बामनोलकर आणि प्रताप देशमुख लिखित शिवराज माने दिग्दर्शित दिर्घांक "हाफ कर्टन" तसेच छांदिष्ट कला संस्कृती प्रस्तुत शोधन भावे लिखित धनंजय कुलकरनु दिग्दर्शित " इस खेल मे हम होना हो" ह्या एकांकिकेचा प्रयोग होणार आहे. दोन्ही नाटकाचे निर्माते म्हणून अशोक निर्मळ ह्यांनी हि भूमिका साधली आहे. दोन्ही नाटकांचे विषय वेगळे आहेत.
"हाफ कर्टन" हे नाटक बॅक स्टेज रंगकर्मीवर तर "इस खेळ मे हम होना हो " हे नाटक स्त्रियांवर आधारित आहेत. प्रेक्षकांना नव्या विषयांची एक मेजवानी मिळेल एवढे मात्र नक्की. कला प्रसार, प्रचार व संवर्धन ह्या उद्देशांना सम्यक कलांश प्रतिष्ठान संस्थे पुणे शहरात नाट्यगंध थिएटर ह्या नाट्य विभागाची सुरुवात करून २ वर्ष पूर्ण केली. मागील वर्षी "दाभोलकरांना दिसलेले भूत" ह्या नाट्य प्रयोग नंतर हे दुसरं नाटक आहे. अत्यंत मेहनत घेऊन ह्या नाटकाची तालिमी कलाकारांकडून करून घेण्यात आल्या. १७ जूनला सज्ज आहे. दुपारी १ वाजता... भरत नाट्यमंदिर, पुणे. दोन्ही नाटकं आपल्यासाठी.. नक्की या ..



Wednesday 7 June 2017

Maharashtra times



नमस्कार,
            अपेक्षा आणि उपेक्षांच गणित मांडत बसणं म्हणजे वजाबाकी बेरजेचे घोळ होतातच.. अपेक्षाविरहित काम केलं तर योग्य वेळी फलित होतंच..
प्रामाणिक कार्य हे कोणी पाहणार कुणीच नसत असं काही नाही... वेळ द्यावा लागतो आणि घ्यावा सुद्धा... गेल्या ७-८ वर्षे सम्यक कलांश प्रतिष्ठाणची धुरा सांभाळताना बरेच अडथळे सामोरे गेलो... एक जिद्द आज हि, शंभर दिवसांचे हे प्रस्थापित मोड घालून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. पुढील असंख्य संकटाला सामोरे जायला एक गाणं नेहमी मनात कोरली आहे.

" मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची
झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची
जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची.....