Saturday 26 May 2018

नृत्य कार्यशाळा

सम्यक कलांश प्रतिष्ठान गेले ९ वर्ष सांस्कृतिक कार्य क्षेत्रात ना नफा ना तोटा या तत्वावर कार्यरत आहे. कला संवर्धन, जतन व प्रसार या उद्देशाने विविध सांस्कृतिक उपक्रम संस्था यशस्वीरित्या राबवत आहे.
येत्या दिनांक १६ व १७ जून २०१८ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित कलाकृती अकादमीच्या माध्यमातून नृत्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ह्या कार्यशाळेत लोकनृत्य व शास्त्रीय नृत्य यांवर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सदर कार्यशाळेत लोकनृत्याचे जेष्ठ दिग्दर्शक व अभ्यासक श्री सदानंद राणे सर यांसकडून लोकनृत्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. श्री सदानंद राणे सर यांनी अनेक वर्ष सह्याद्री वाहिनीवरील लोकप्रिय धिना धिन धा या कार्यक्रमात परिक्षक म्हणून कार्य केले आहे. तसेच ते अनेक लोकनृत्यांच्या कार्यक्रमात नृत्यदिग्दर्शकाची भूमिका चोख बजावत आहेत. शास्त्रीय नृत्यासाठी श्रीमती डॉ.किशु पाल मॅडम या प्रशिक्षण देणार आहेत. डॉ.किशु पाल मॅडम यांनी तंजावर घराण्यातील पंडित श्री वेणूगोपाल पिल्लई यांच्याकडून भरतनाट्यम् आणि डॉ.व्यंकटेश्वर राव यांच्याकडून कुचिपुडी या शास्त्रीय नृत्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच या नृत्यांच्या प्रशिक्षणात त्यांनी पदवी देखील मिळवली आहे.
अशा दिग्गज व्यक्तिमत्वांकडून प्रशिक्षण घेण्याची अमुल्य संधी रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर येथे उपरोक्त संस्था सम्यक कलांश प्रतिष्ठान यांच्याकडून सर्वांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. तसेच रंगभूषेची सत्रही या कार्यशाळेत घेण्यात येणार आहे. कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे व त्यांना संस्थेच्या आगामी कार्यक्रमात संधी देण्यात येईल. तरी इच्छूकांनी दिलेल्या क्रमांकावर लवकरात लवकर नावनोंदणी करावी असे संस्थेकडून आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क: ९८९२३९२३०६ / ९८२१७११४६२

No comments:

Post a Comment