Tuesday 15 May 2018

नृत्य कार्यशाळा नाव नोंदणी सुरु





नमस्कार 
आपणास कळविण्यात येत आहे कि सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत कलाकृती अकादमीच्या माध्यमातून दिनांक १६ व १७ जून २०१८ रोजी सकाळी  ८ ते दु. २ वाजेपर्यंत नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हि नृत्य कार्यशाळा लोकनृत्य व शास्त्रीय नृत्य अशा २ विभागात  आखली गेली आहे. लोकनृत्याच्या मार्गदर्शनासाठी जेष्ठ लोकनृत्य दिग्दर्शक व लोकनृत्य अभ्यासक श्री. सदानंद राणे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहे.सदानंद राणे सर अनेक वर्ष सह्याद्री वाहिनीवरील 'धिना धिन धा' या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून कार्यरत असून तरुणांना लोकनृत्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.
 तसेच शास्त्रीय नृत्यासाठी प्रसिद्ध भरतनाट्यम / कथक प्रशिक्षिका ह्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे. डॉ.किशु पाल यांनी अनेकांना शास्त्रीय नृत्याचे धडे दिले आहेत. सदर कार्यशाळा पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित केली असून हि कार्यशाळा सर्व वयोगटातील लोकांसाठी खुली आहे. कार्यशाळेत सहभागी होणार्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तरी जास्तीतजास्त जणांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे संस्थेने आवाहन केले आहे.
कार्यशाळेत सहभागी होण्याकरिता दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.
९८९२३९२३०६
९८२१७११४६२

No comments:

Post a Comment