Saturday 15 December 2018

विनामूल्य चित्रकथी कार्यशाळा



दिनांक २२ व २३ डिसेंबर २०१८ दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी(मुंबई) येथे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र - नागपूर यांच्या सहयोगाने सम्यक कलांश प्रतिष्ठान यांच्यावतीने "चित्रकथी " ह्या महाराष्ट्राच्या पारंपरिक चित्रकलेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर आदिवासी समाजाची लोककला श्री. परशुराम गंगावणे ह्यांनी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी - गुढीपूर येथे जतन व संवर्धन केली आहे. अशा लुप्त होणाऱ्या लोककलेला पुन्हा लोकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने सम्यक कलांश प्रतिष्ठान सदैव कार्यरत आहे. सदर कार्यशाळेचे प्रशिक्षण श्री. एकनाथ परशुराम गंगावणे करणार आहे. तसेच सांस्कृतिक कलेचा वारसा जपणारी आपली लोककला पुनर्जीवित होऊन नावीन्याने उदयास यावी ह्या हेतूने मुंबई सारख्या शहरात त्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. हि कार्यशाळा विनामूल्य असून त्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग दर्शवावा असे आव्हान सम्यक कलांश प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. शशांक किसन बामनोलकर यांनी केले आहे. कार्यशाळे करिता आपली नावनोंदणी दिलेल्या नंबरावर करावी. अक्षय ९८६९९९४०४४ /अनिकेत ९८२१७११४६२

No comments:

Post a Comment