Tuesday, 10 December 2019
Christmas vacation workshop
Wednesday, 14 August 2019
Wednesday, 5 June 2019
Registration start
सम्यक कलांश प्रतिष्ठान (रजि.)
स्थापना - ११ ऑक्टोबर २००९
उद्दिष्ट - नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
१० वर्षात आयोजित कार्यक्रम -
१) झेप एकेरी गायन स्पर्धा २०११ - मुंबई विद्यापीठ , कालीन
२) ५ वर्षे मुंबई विद्यापीठात हौशी / नवोदित / अनुभवी लघुपट निर्माते व दिग्दर्शकांसाठी व्यासपीठ - आयोजन
३) गेले ३ वर्ष नजरे आड राहिलेल्या एकांकिकेला प्राधान्य देणारे नाट्यगंध महोत्सव
व नजरे आड राहिलेल्या रंगकर्मींचा सत्कार
४) कलाकृती अकादमीच्या माध्यमातून नाट्य , गायन , नृत्य , लोककला व चित्रपटाशी निगडित विषयांची कार्यशाळा.
५) अनाथ व मतिमंद मुलांसाठी विविध कार्यक्रम व कार्यशाळा
सादर झालेले कार्यक्रम -
१)संस्थे अंतर्गत सादर झालेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम -
नृत्य - कलाविष्कार , महाराष्ष्ट्राची सोनेरी पाऊल
गायन - स्वरामृत , दिंडी अभंगाची , बौद्धमय संध्या
नाटक - *एकांकिका - चिंगी (२००९), फळा (२०११), लिव्ह इन रिलेशनशिप(२०१३), स्पर्श (२०१४),
* २ अंकी नाटक - महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेले नाटक
देवनवरी (२०१५) , सामन्याचा असामान्य राजा (२०१६), बिन बाईचा राजवाडा(२०१७) , किरवंत (२०१८)
* प्रयोगात्मक सादर झालेल्या नाटक व नाटिका -
१) वस्त्रहरण झालं का ? - १० प्रयोग (२०१७)
२) बिन बाईचा राजवाडा - १३ प्रयोग (२०१८)
----------------------------------------------------------------------------
या सभासद व्हा आणि रंगमंचाचा अनुभव घ्या .. !
नमस्कार ,
सम्यक कलांश प्रतिष्ठान यंदाच्या वर्षी १० व्या वर्षाची यशस्वी वाटचाल करीत आहे.
गेल्या १० वर्षाच्या प्रवासात संस्थेने अनेक उपक्रम राबविले व आयोजित केले. संस्थेच्या आजवरच्या संपूर्ण प्रवासाचा माहितीपट लवकरच आपल्या समोर येईलच.
तसेच पुढील प्रवासात जर आपण देखील सहभागी होणार असाल तर नक्कीच आपले स्वागत आहे. त्या करिता सभासद नोंदणीसाठी २ वर्गवारी करण्यात अाली आहे .
१) कलाकार सभासद - नाट्य, नृत्य व संगीत क्षेत्रातील हौशी , नवोदित व अनुभवी कलाकार नक्कीच आपला सहभाग ह्यात नोंदवू शकतात.
२) प्रेक्षक सभासद - रंगवामचावर सादर होणाऱ्या कलाकृती व तसेच संस्थेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कार्यशाळेचा भाग होऊ इच्छिणारे प्रेक्षक देखील सहभागी होऊ शकतात.
नोंदणी करण्यासाठी इच्छुक अशा सर्व सभासदांची अधिकृत सभा घेऊन पुढील वाटचालीचे प्रयोजन सांगण्यात येईल.
वयोमर्यादा १५ वर्षावरील पुढे
*नाव नोंदणी करिता हवी असलेली माहिती -
आपले नाव , पत्ता , वय , सभासत्व - कलाकार सभासद / प्रेक्षक सभासद (जर कलाकार असल्यास कोणती कला व त्याचा अनुभव ह्याचा ठळक उल्लेख असावा. )
वरील माहिती दिलेल्या नंबरावर व्हाट्स अप द्वारे किंवा संस्थेच्या मेल द्वारे पाठवावी .
आपली माहिती मिळाल्यावर आपल्याला लवकरच अधिकृत सभेचे प्रयोजन कळविण्यात येईल.
* मोबाईल नंबर - सुनील - ८४५२८७५३९० / ९२६९९९४०४४
* मेल आयडी - samyakkalanshpratishthan@gmail.com
आपला अभिलाषी
श्री. शशांक बामनोलकर
अध्यक्ष - सम्यक कलांश प्रतिष्ठान
# आपल्याला सम्यक कलांश प्रतिष्ठान संस्थेची अधिक माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या ब्लॉगला भेट द्या.
www.samyakkalansh.blogspot.com\
Wednesday, 15 May 2019
Thursday, 28 March 2019
दिनांक २६ व २७ मार्च २०१९ रोजी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त नाट्यगंध महोत्सवाचे
Saturday, 16 February 2019
Natyagandh mahotsav 2019
Friday, 18 January 2019
Vocal Practice Workshop
Kalakruti Academy organize Singing Workshop.....
*Vocal Practice Workshop*
Time : 6pm To 9pm
Age : Open Categories