Monday, 1 June 2015

नृत्य आणि गायन विभागाचे सुरुवात लवकरच करणार

नमस्कार मित्रानो … 

आपल्याला कळविण्यात आनंद होत आहे कि सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध ह्या नाट्य विभागाच्या यशस्वी सुरुवाती नंतर सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नृत्य आणि गायन विभागाचे सुरुवात लवकरच करणार असून हौशी, अनुभवी व प्रशिक्षित नृत्य, गायक तसेच वादक तरुण कलाकारांना ह्यात सहभागी होता येणार आहे .

धन्यवाद !!!

आपला नम्र 
शशांक बामनोलकर
(अध्यक्ष - सम्यक कलांश प्रतिष्ठान)

Saturday, 23 May 2015

मराठी लोककलेच पथक

नमस्कार मित्रांनो..
सम्यक कलांश प्रतिष्ठान चे नव नवीन उपक्रम हे वर्षभर असतात . सांस्कृतिक कार्यक्रम सादर व संवर्धन हे जसे उदेश आहेत तसेच जतन करणे हा देखील उद्देश संस्थेचा आहे . ह्या सांस्कृतिक उद्देशाला आधारून सम्यक कलांश प्रतिष्ठान चे पुन्हा एक नव पाऊल महाराष्ट्रातील लोककलेच्या बाबतीत पुढे येत आहे . लवकरच सम्यक कलांश प्रतिष्ठान मराठी लोककलेच पथक (ज्यात गण , भारुड , पोवाडे व गोंधळ अशा लोक गीतांचा समावेश असेल.)  सुरु करीत आहोत . सदर पथकासाठी हौशी तरुण वादक (हार्मोनियम, संबळ , तबला, ढोलकी , ढोलक व इतर लोककलेशी निगडीत वादक) असल्यास त्यांनी आपली थोडक्या माहिती खालील मेल द्वारे पाठवावी
 .
email - samyak,kalansh@gmail.com
blog - samyakkalansh.blogspot.com

(टीप- वादक कलाकार मुंबईतील स्थानिक असावेत .)

धन्यवाद .