सांस्कृतिक कार्य क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सम्यक कलांश प्रतिष्ठान संस्था विविध उपक्रम आयोजित करते. असाच एक अभिनव उपक्रम "नाट्यगंध महोत्सव" गेले ३ वर्षे संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले जाते. ज्यात स्पर्धेत नजरे आड राहिलेल्या एकांकिका सादर होतात. तसेच नजरे आड राहिलेल्या रंगकर्मींचा सत्कार केला जातो . यंदाच्या वर्षी सम्यक कलांश प्रतिष्ठान यांनी साठेय महाविद्यालय यांच्या सहयोगाने दिनांक २६ व २७ मार्च २०१९ रोजी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त नाट्यगंध महोत्सवाचे आयोजन साठेय महाविद्यालयात केले. ज्यात ८ नजरे आड राहिलेल्या एकांकिका व नजरे आड राहिलेल्या रंगकर्मींचा सत्कार करण्यात आला. ह्या महोत्सवाचे उदघाटन मागील वर्षी सत्कार करण्यात आलेले जेष्ठ हार्मोनियम वादक श्री . सुभाष खरोटे यांच्या हस्ते झाले सादर उद्घाटनास साठेय महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक सौ. जयश्री गायकवाड , नाट्य विभाग प्रमुख श्री. समीर जाधव , एन. एस. एस. विभाग प्रमुख गौतम म्हस्के सह सम्यक कलांश प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष श्री शशांक बामनोलकर उपस्थित होते. पहिल्या दिवशी १२ चे यांचे चक्रव्यूव्ह , मा.वे.दे . हरिया महाविद्यालय, शहाड - हृदयस्पर्श ,इम्पिरिअल फाऊंडेशन - लेणी व चेतन टेमबुर्णीकर याचे मंटो यावर एकपात्री सादर झाले. तसेच महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी टॅलेंट हंट एंटरटेनमेंट - बायो मॅट्रिक , नवे पर्व - मिरज दंगल ,मुक्त छंद - जीर्णधार व प्राण थिएटर - एका रबराची गोष्ट सादर झाल्या. महोत्सवाची सांगता करताना सत्कारमूर्ती रंगभूषाकर श्री . वामन गमरे , रंगकर्मी श्री. चंद्रशेखर मेस्त्री आणि जेष्ठ रंगकर्मी व अनेक नाटकाचे सूत्रधार श्री. प्रभाकर ( गोट्या ) सावंत ह्यांचा सत्कार तरुण नाट्य तरुण नाट्य निर्माते ( अद्वैत थिएटर)/ नाट्य निर्माते संघाचे प्रमुख कार्यवाहक श्री . राहुल भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. अशा दिगज्जांच्या हस्ते सहभागी संघा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले व नाट्यगंध महोत्सवाची सांगता करण्यात आली .
Thursday, 28 March 2019
Saturday, 16 February 2019
Natyagandh mahotsav 2019
नाट्यगंध महोत्सव २०१९ (वर्ष ३ रे )
प्रति ,
संपादक / संचालक
दिनांक २० आणि २१ फेब्रुवारी रोजी सम्यक कलांश प्रतिष्ठान आणि साठये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यगंध महोत्सव २०१९ पार पडणार आहे. हा एक अभिनव उपक्रम असून यंदा ह्या महोत्सवाचे हे ३रे वर्ष आहे. नजरेआड राहिलेल्या एकांकिका आणि नजरेआड राहिलेले रंगकर्मी यांच्या साठी खास या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तांत्रिकदृष्ट्या मागे राहिलेल्या आणि २०१८-१९ या वर्षात स्पर्धेत न जिंकलेल्या १० एकांकिकांचा या महोत्सवात सहभाग असणार आहे. सदर महोत्सव हा हौशी व नजरेआड राहिलेल्या कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी आयोजित केला आहे. प्रत्येक अभिजात कलाकृती हि प्रेक्षकांसाठी असते या भावनेने हा महोत्सव फक्त सादरीकरणासाठी खुला आहे. तसेच सर्वांसाठी हा महोत्सव विनामूल्य आहे. सकाळी १० ते ५ या वेळेत साठये महाविद्यालयात हा महोत्सव पार पडेल.
सदर बातमी आपण आपल्या वृत्तपत्राद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवावी. / सदर महोत्सव आपल्या प्रसार माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यास आपण उपस्थित रहावे.
अक्षय जोष्टे (महोत्सव प्रमुख /समन्वयक)
९१ ९८६९९९४०४४
आपला अभिलाषी
श्री. शशांक किसन बामनोलकर
अध्यक्ष - सम्यक कलांश प्रतिष्ठान
Subscribe to:
Posts (Atom)

