Monday, 26 October 2015

५५ व्या राज्य नाट्य स्पर्धे

। रंगदेवता प्रसन्न ।।

नमस्कार
आज आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होत आहे . सम्यक कलांश प्रतिष्ठान यंदाच्या ५५ व्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभागी होत असून दिनांक २१ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी ११ वाजता , यशवंत नाट्यमंदिर , माटुंगा येथे सम्यक कलांश प्रतिष्ठान सदर करीत आहे प्रेमानंद गज्वी लिखित २ अंकी नाटक "देवनवरी" . देवदासी प्रथेवर प्रकाश टाकणारे प्रेमानंद गज्वी साहेबांच लिखाण व तरुण कालारांनी सादर केलेली भूमिका ह्या अत्यंत वास्तविक गोष्टींचा भास दर्शविणारे नाटकाची प्राथमिक फेरी पाहण्यास आपण नक्की यावे . आज पर्यंत आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी चांगल्या कामाची दात व धाडसाची शाबाशकी आम्हाला दिली व ती ह्याही पाऊलावर आम्हाला मिळो हिच रंगदेवतेकडे इच्छा !!!

Friday, 3 July 2015

सर्व हौशी कलाकारंना नमस्कार ….

!! रंगदेवता !!
सर्व हौशी कलाकारंना नमस्कार ….
सम्यक कलांश प्रतिष्ठान हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन आणि सदर करणारा एक व्यासपीठ असून पुढील नव्या प्रोजेक्ट साठी नवे हौशी तरुण कलाकारांसाठी एक संधी उपलब्ध करून देत आहोत .
सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नृत्यगंध आणि स्वरगंध ह्या नृत्य व संगीत विभागासाठी नवे हौशी कलाकारांसाठी नवे मंच उपलब्ध करून देत आहे . मुंबईत राहणाऱ्या कलावंतांसाठी हि संधी असून इच्छुक कलाकारांनी आपली थोडक्यात माहिती (नाव , पत्ता , वय , संपर्क इत्यादी.) मेल द्वारे पाठविण्यात यावी . 

email - samyak.kalansh@gmail.com / samyakkalansh11@rediffmail.com

(कलाकारांची संख्या मर्यादित असल्याने आपले मेल लकारात लवकर पाठवावे.)

सम्यक कलांश प्रतिष्ठान बद्दल आणखी माहिती असल्यास खालील ब्लॉग वर भेट द्या . 


आपला नम्र 
शशांक बामनोलकर
(अध्यक्ष - सम्यक कलांश प्रतिष्ठान)