Tuesday, 25 October 2016

Shadow puppets workshops

Samyak kalansh Pratishthanpister organise SHADOW PUPPETS WORKSHOPS
More details give in poster...

सम्यक कलांश प्रतिष्ठान यंदाच्या नाताळच्या सुट्ट्या निमित्त दिनांक ११ , १८ आणि २५ डिसेंबर २०१६ रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी , प्रभादेवी , दादर (रवींद्र नाट्य मंदिर) येथे दुपारी २ ते ४ वाजे पर्यंत  (आयोजित दिवस ३ रविवार आहेत )शॅडो पपेट्स वर्कशॉप चे आयोजन करीत असून इच्छुक सर्व वयोगटातील लोकांस ते खुले आहे. मुंबईत प्रथमच असे आयोजन करीत असून त्यात प्रत्यक्षरित्या पपेट्स बनविण्याचे शिकवले जाणार असून ते हाताळणे हे प्रत्यक्ष शॅडो पपेट्स च्या माहिती व प्रसिद्ध असलेल्या माधुरी काळे मॅडम ह्यांच्याकडून दाखविले जाईल.  सर्व इच्छुक सहभागी लोकांनी सहभागी व्हावे ह्या कारणास्तव फक्त रविवार निवडून ह्याचे आयोजन केले आहे. सर्व सहभागी इच्छुकांनी खाली दिलेल्या नंबरावर आपले नाव नोंदणी करावी. सहभागी नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शॅडो पपेट्स ची सामग्री आयोजकांना कडून पुरवली जाईल. तसेच सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल. 
इच्छुकांनी दिनांक २० नोव्हेंबर २०१६ पर्यंत नाव नोंदणी करावी व मर्यादित प्रवेश आहे . 
सुनील - ८४५२८७५३९०  सागर - ८०८०४३६८२३

Monday, 19 September 2016

"७ वा वर्धापन दिन सोहळा "आमचा आनंद, त्यांच्या आनंदासाठी"
















 "७ वा वर्धापन दिन सोहळा "आमचा आनंद, त्यांच्या आनंदासाठी" 


नमस्कार, 
आजवर सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर ठरणारा. सम्यक कलांश प्रतिष्ठान यंदाच्या ११ ऑक्टोबर २०१६ रोजी आपला ७वा वर्धापन दिन साजरा करीत आहेत. ह्या ७ व्या वर्धापन दिना निमित्त बदलापूर येथील  "राम कृष्ण हरी वृद्धाश्रम "  येथे सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध विभागाचा लोकनाट्य "वस्त्रहरण झालं का ?"  ह्या नाटकाचा प्रयोग तेथील वृद्धांसाठी सादर करीत आहोत. तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम खास त्यांच्यासाठी आखत आहोत.  जर आपल्याला ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर नक्कीच होऊ शकता.

वृद्धाश्रमचा पत्ता - राम कृष्ण हरी वृद्धाश्रम, संगोपीत आश्रमा जवळ,  बेंडशील, कुळगाव बदलापूर - पूर्व, 



आपला नम्र,
संपूर्ण सम्यक कालांश प्रतिष्ठान परिवार