Sunday 28 July 2013

दिंडी अभंगाची news







गुरुवार दिनांक  २५ जुलै २०१३ रोजी मुंबई विद्यावीठात सम्यक कलांश प्रतिष्ठान आणि १०७.८ must  radio यांच्या संयुक्त विद्यमाने शशांक बामनोलकर संकल्पित दिंडी अभंगाची हा संतांच्या अभंगावर आधारित गायनाचा कार्यक्रमाचा संगीतमय सोहळा यशस्वीरित्या पार पडला.ह्या  सोहळ्याचे उदघाटन १०७.८ must  radio  चे प्रबंधक आणि संचालक डॉ. नीरज हातेकर ह्यांच्या हस्ते झाले.  ह्या कार्यक्रमाचे  वैशिष्ठ असे कि अशा प्रकारे अभंगावर आधारित कार्यक्रम मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच पार पडला. नवोदित कलाकारांना हक्काच  व्यासपीठ देणारा सम्यक कलांश मंचात अभंग सादर करणारे काही मुंबई विद्यापीठातील कर्मचारी देखील होते तसेच कार्यक्रमाला रंग चढला  तो अश्विनी करांडे हिच्या अनोख्या नृत्य आविष्काराने आणि सम्यक कलांश मंचातील जेष्ठ ताल वादक वासुदेव साहिल  आणि नवोदित ताल वादक वैभव कामेकर ह्यांच्यातील जुगलबंदीने. गायनाची धुरा सांभाळली सुनील शिगवण, प्रीती भोवड, श्रुतिका शिगवण, अविनाश तांबे, संजय खंडागळे, सिद्धेश चव्हाण, जयेश जंगले , प्रशांत चव्हाण आणि  दीप्ती धोत्रे इत्यादी  त्यांना वादकांनी दिलेली साथ सीताराम शिगवण आनंद मोरे, संजय पवार, संकेत निकम, वैभव कामेकर आणि वासुदेव साहिल ह्यांनी.  कलाकारांचा अविभाज्य भाग असलेला प्रेक्षकांनी  ह्या कार्यक्रमाला भर भरून दाद देऊन सम्यक कलांश मंचाला पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्या.                 







































सम्यक कलांश प्रस्तुत दिंडी अभंगाची कार्यक्रमातील जुगलबंदी 





No comments:

Post a Comment