Friday 3 November 2017

दिनांक २७ ते २९ ऑक्टोबर २०१७... निवासी कार्यशाळा पिंगुर्ली

दिनांक २७ ते २९ ऑक्टोबर २०१७ रोजी सम्यक कलांश प्रतिष्ठान, मुंबई आणि ठाकर आदिवासी कला आंगण, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रोजेक्ट कलाकृती लोक संस्कृती अंतर्गत चित्रकथी आणि चामड्याच्या बाहुल्या ह्या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोक कलेवर आधिरीत निवासी कार्यशाळा पिंगुर्ली (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे यशस्वीपणे संपन्न झाली. आदिवासी लोक कलेचा वारसा ज्यांनी वडिलोपार्जित जपला असे श्री. परशुराम गंगावणे व त्यांचे कुटुंबीय यांच्या मार्गदर्शन खाली हि कार्यशाळा झाली. मूळ महाराष्ट्राचे कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी व चांबड्यांच्या बाहुल्या हि लोक कला ह्या कुटुंबीयांनी जतन केले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या अभंगात ह्या कलेचा उल्लेख आपल्याला मिळेल. अशी तीन दिवसीय निवासी कार्यशाळे साठी हैद्राबाद, पुणे व मुंबईहून विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला होता. एक वेगळा आनंद सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. तसेच असे निवासी कार्यशाळा पुन्हा नव्या लोक संस्कृतीवर आयोजित केले जातील अशी माहिती संस्थेचे संचालक शशांक बामनोलकर यांनी दिली.


No comments:

Post a Comment