Saturday, 15 December 2018
विनामूल्य चित्रकथी कार्यशाळा
Sunday, 9 December 2018
Christmas vacation workshop 2018
Wednesday, 7 November 2018
प्रेक्षक सभासद नोंदणी अर्ज
*टिप -१) नाव नोंदणी करिता कोणत्याही प्रकारे शुल्क नाही. आपला प्रतिसाद पाहून सर्व इच्छुक सभासदांची बैठक घेऊन पुढील वर्षाची माहिती दिली जाईल व अधिकृत सभासद म्हणून नाव नोंदणी केली जाईल.
२ ) ह्यात वयाची अट नाही.
Sunday, 28 October 2018
*प्रकाशमय दीप*
*प्रकाशमय दीप*
अनाथ, गरीब गरजू मुलांसोबत साजरी करू अनोखी दिवाळी
या.. गरिबी वस्तीत श्रीमंत मनाची ज्योती पेटवू
नमस्कार,
यंदाच्या वर्षी आम्ही अंधारलेल्या गरीब गरजू लहान मुलांसोबत दिवाळी साजरी करतोय. त्यात काही अनाथ आहेत तर काही रस्त्यावर राहणारी. एक छोटा प्रयत्न करतोय त्यांच्या सोबत एक अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा. लहानमुलांच्या बुद्धिकौशल्याचे खेळ, बोलक्या बाहुल्याचे खेळ - कला आणि मनोरंजन सोबत संपूर्ण दिवस घालविण्याचा एक प्रयत्न आम्ही करतोय. आर्थिक अपुऱ्या अडचणीत प्रज्वलित झालेल्या दिवाळीत अंधारात राहणाऱ्या गरिबीत श्रीमंतीची ज्योत पेटवुया..
जर आपण वरील उपक्रमास आर्थिक सहकार्य करणार असाल तर आपली आर्थिक देणगी खाली दिलेल्या संस्थेच्या बँक अकाऊंट वर पाठवून द्या.
आपला अभिलाषी
श्री. शशांक बामनोलकर- 9664159343
अध्यक्ष - सम्यक कलांश प्रतिष्ठान, मुंबई
SAMYAK KALANSH PRATISHTHAN
Bank name - NKGSB Bank
Branch - Bandra, East
BANK AC N0. - 005100100013094
IFSC - NKGS0000005
Branch Code - 000005
MICR - 400086005
Monday, 1 October 2018
"चित्रकथी" कार्यशाळा
Friday, 28 September 2018
*।आमंत्रण।* ९ व्या वर्धापन दिनानिमित्त
Friday, 24 August 2018
*|| नानारुचि रसिकां दे केवळ नाटक पुरें समाधान ।।*
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
*विषय- आपल्या गणशोत्सव मंडळात नाटक सादर करण्याची संधी उपलब्ध करुन देण्याबाबत.*
सम्यक कलांश प्रतिष्ठान गेले ९ वर्ष सांस्कृतिक कार्य क्षेत्रात कार्यरत आहे. कला संवर्धन, जतन व प्रसार या उद्देशाने नृत्य, गायन आणि नाटक अशा विविध माध्यमांतून सांस्कृतिक उपक्रम संस्था यशस्वीरित्या राबवत आहे.
आपले मंडळ स्थानिक लोकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. आपण मराठी भाषेचा प्रसार आणि संवर्धन करीत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या महाराष्ट्राला लोककलेचा खुप मोठा वारसा लाभला आहे. समाजात एकोपा निर्माण व्हावा आणि समाजप्रबोधन व्हावे या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. आज आपले मंडळ ह्या कार्यात मोलाचे योगदान देत आहे. उपरोक्त संस्था सम्यक कलांश प्रतिष्ठान लोकनाट्याचे जतन व्हावे या उद्देशाने *'बिन बाईचा राजवाडा'* या नाटकाचे प्रयोग करीत आहे. सदर नाटक बुवाबाजी या विषयावर आधारित असून त्यावर कलाकारांनी विनोदी ढंगाने खुमासदार भाष्य केले आहे.
आपल्या मंडळाद्वारे तेथील स्थानिक प्रेक्षकांसाठी आम्ही सदर नाटकाचा प्रयोग माफक मानधनात करू इच्छितो. तरी आपण या नाटकाचा प्रयोग आपल्या मंडळात सादरकरण्याची करण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी, हि नम्र विनंती.
जर आपण प्रयोग पाहण्यासाठी इच्छुक असाल तर आम्हाला कळवा, मुंबईत होणाऱ्या ऑगस्ट महिन्यातील प्रयोगा विषयक आम्ही आपणास कळवू.
*शशांक बामनोलकर*
( लेखक / दिग्दर्शक - बिन बाईचा राजवाडा)
Saturday, 18 August 2018
Thursday, 16 August 2018
Wednesday, 25 July 2018
Saturday, 16 June 2018
कार्यशाळा सत्र पहिले संपन्न
सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित कलाकृती अकादमी च्या नृत्य कार्यशाळेचे.. आज पहिले सत्र संपन्न झाले .. लोकनृत्य प्रशिक्षणासाठी श्री सदानंद राणे सर व रंगभूषा च्या सत्रासाठी श्री गणेश कारंडे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.. त्यांस मनपुर्वक धन्यवाद.. उद्याचे शास्त्रीय नृत्याचे सत्र डॉ. श्रीमती किशु पाल यांच्या मार्गदर्शनाखाली..
Saturday, 26 May 2018
नृत्य कार्यशाळा
सम्यक कलांश प्रतिष्ठान गेले ९ वर्ष सांस्कृतिक कार्य क्षेत्रात ना नफा ना तोटा या तत्वावर कार्यरत आहे. कला संवर्धन, जतन व प्रसार या उद्देशाने विविध सांस्कृतिक उपक्रम संस्था यशस्वीरित्या राबवत आहे.
येत्या दिनांक १६ व १७ जून २०१८ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित कलाकृती अकादमीच्या माध्यमातून नृत्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ह्या कार्यशाळेत लोकनृत्य व शास्त्रीय नृत्य यांवर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सदर कार्यशाळेत लोकनृत्याचे जेष्ठ दिग्दर्शक व अभ्यासक श्री सदानंद राणे सर यांसकडून लोकनृत्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. श्री सदानंद राणे सर यांनी अनेक वर्ष सह्याद्री वाहिनीवरील लोकप्रिय धिना धिन धा या कार्यक्रमात परिक्षक म्हणून कार्य केले आहे. तसेच ते अनेक लोकनृत्यांच्या कार्यक्रमात नृत्यदिग्दर्शकाची भूमिका चोख बजावत आहेत. शास्त्रीय नृत्यासाठी श्रीमती डॉ.किशु पाल मॅडम या प्रशिक्षण देणार आहेत. डॉ.किशु पाल मॅडम यांनी तंजावर घराण्यातील पंडित श्री वेणूगोपाल पिल्लई यांच्याकडून भरतनाट्यम् आणि डॉ.व्यंकटेश्वर राव यांच्याकडून कुचिपुडी या शास्त्रीय नृत्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच या नृत्यांच्या प्रशिक्षणात त्यांनी पदवी देखील मिळवली आहे.
अशा दिग्गज व्यक्तिमत्वांकडून प्रशिक्षण घेण्याची अमुल्य संधी रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर येथे उपरोक्त संस्था सम्यक कलांश प्रतिष्ठान यांच्याकडून सर्वांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. तसेच रंगभूषेची सत्रही या कार्यशाळेत घेण्यात येणार आहे. कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे व त्यांना संस्थेच्या आगामी कार्यक्रमात संधी देण्यात येईल. तरी इच्छूकांनी दिलेल्या क्रमांकावर लवकरात लवकर नावनोंदणी करावी असे संस्थेकडून आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क: ९८९२३९२३०६ / ९८२१७११४६२
Tuesday, 15 May 2018
नृत्य कार्यशाळा नाव नोंदणी सुरु
Tuesday, 8 May 2018
*कलाकृती अकादमी - नृत्य कार्यशाळा*
*सम्यक कलांश प्रतिष्ठान* संचालित
*कलाकृती अकादमी - नृत्य कार्यशाळा*
👉🏻 दिनांक शनिवार १६ व रविवार १७ जुन २०१८ रोजी
👉🏻 सका. ८ ते २ वा. पर्यंत (दोन्ही दिवस)
👉🏻 शास्त्रीय नृत्य व लोकनृत्य यांची ओळख.
👉🏻 अनुभवी मार्गदर्शन व प्रशिक्षण.
👉🏻 ग्रृपला माफक फि
👉🏻 कार्यशाळेत सहभागी होण्याचे प्रमाणपत्र.
कार्यशाळा शुल्क ₹ १०००/- (दोन्ही दिवस)
👉🏻 *कार्यशाळा / ठिकाण :-* लावणी हॉल , ३रा मजला,
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रविंद्रनाट्य मंदिर , सिध्दी विनायक मंदिर मागे, प्रभादेवी, दादर -(प.), मुंबई.
संपर्क - ९८९२३९२३०६
Tuesday, 10 April 2018
Saturday, 7 April 2018
अभिनय कार्यशाळा
*सम्यक कलांश प्रतिष्ठान* अंतर्गत *कलाकृती अकादमी* आयोजित
*_"अभिनय कार्यशाळा" वर्ष २रे_*
दिनांक १३ मे २०१८ पासून मुंबई येथे सुरु होत आहे.
👉🏻 *प्रमुख मार्गदर्शक*
१) *श्री. संजीव धुरी* : अभिनेता - नाटक, चित्रपट, जाहिरात व मालिका नाट्यदिग्दर्शक
२) *श्री. उमेश घळसासी* : एम.ए.नाट्यशास्त्र, अभिनेता, प्रशिक्षक व्हाईस कल्चर, आकाशवाणी निवेदक
👉🏻 दिग्गज, अनुभवी व कार्यशील *मान्यवरांचे मार्गदर्शन* कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
👉🏻अभिनय हि कला प्रत्येयदर्शी आहे म्हणून कार्यशाळेचा *उद्देश हा प्रत्येयदर्शी असेल.*
👉🏻कार्यशाळेतील सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांवर लक्ष देता यावे म्हणून *मर्यादित विद्यार्थी* असतील. तसेच हि बॅच वर्षातून एकच असेल.
👉🏻 *महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २०% सवलत* आहे.
🔸 *सूचना*- _सहभागी इच्छुक विदयार्थ्यांची मिटिंग घेऊनच पुढील कार्यशाळा प्रवेश सुरु होईल._
♦नाव नोंदणीसाठी संपर्क साधा.
📞 ७०४५७५३९९२
Tuesday, 20 February 2018
Good wishes from Mr. Ramdas Athavale (Minister of social justice , Govt. Of India )
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री
श्री. रामदासजी आठवले साहेब
यांनी सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित व नाट्यगंध थिएटर प्रस्तुत
धमाल विनोदी लोकनाट्य "बिन बाईचा राजवाडा" ह्या नाटकाच्या शुभारंभ प्रयोगासाठी
दिलेल्या अमूल्य शुभेच्छा,,,!
--------------------------------------------------------------------
शुभारंभ प्रयोग - बिन बाईचा राजवाडा
दिनांक ३ मार्च २०१८
सायंकाळी ४ वाजता
रवींद्र नाट्यमंदिर - मिनी थिएटर , प्रभादेवी - दादर
बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ९८२१७११४६२
https://youtu.be/B2v9Tf1eI7M
Monday, 12 February 2018
बिन बाईचा राजवाडा
*।। शुभारंभ प्रयोग |।*
नाट्यगंध थिएटर प्रस्तुत
२ अंकी धमाल विनोदी लोकनाट्य
ठिकाण - मिनी थिएटर- रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर
नृत्य दिग्दर्शक - अश्विनी कारंडे, नेपथ्य - अरुण सुतार
संगीत संयोजक /रंगमंच व्यवस्थापन - अनिकेत मेस्त्री
आशिष चव्हाण , प्रकाश नाचरे, संदीप कटके, महेश गुरव, नागेश ढोणे, हर्षल सोनवणे, महेंद्र राजगुरू, अक्षय पाटणे, सचिन खांबे, नयन वाघेला, वैभव चव्हाण
नृत्यकार - संदेश सातव
www.ticketees.com
Tuesday, 6 February 2018
सम्यक कलांश प्रतिष्ठान "चित्रपट विभाग" - Samyak kalansh pratishthan - film department
आपणास सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे कि येणारे वर्ष हे सम्यक कलांशचे दशकीय वर्ष आहे (११ऑक्टोबर २०१८ ते ११ऑक्टोबर २०१९). आजवर संस्थेच्या विविध विभागाच्या मध्यातून काहींना काही कार्य आजवर कार्य चालू सम्यक कलांश प्रतिष्ठान "चित्रपट विभाग" आहे. अशा विभागात आणखी एका विभागाची भर होणार असून एप्रिल २०१८ पासून कार्यरत होईल.
शशांक बामनोलकर
(संचालक -सम्यक कलांश प्रतिष्ठान)
Monday, 5 February 2018
अभिनय कार्यशाळा
सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित
कलाकृती अकादमी - नाट्य प्रशिक्षण
- १. स्वर साधना
- २. नृत्य साधना
- ३. लेखक / दिग्दर्शक / अभिनय
- ४. रंगभूषा / वेशभूषा
- ५. लाईट / नेपथ्य
- ६. वाचिक अभिनय -
- ७. यूज प्रॉप्स
- ८. काल्पनिक प्रसंग एकेरी / सामूहिक सादरीकरण
- ९. एकपात्री अभिनय स्वलिखित / गाजलेल्या भूमिका
- १०. नाट्य प्रसंग बसविणे.
- ११. वाचिक अभिनय - काव्य , कथा व नाट्य वाचन
- १२. नऊ रस व त्या आधारे प्रसंग घडविणे.
- १३. चित्रपट - कॅमेरा समोरील अभिनय व त्याचे तंत्र
वरील विषयान्वे भर देऊन. सलग १५ दिवस आंगिक, वाचिक , आहार्य व सात्विक अभिनयावर भर देणे.
- १. हि कार्यशाळा इतर कार्यशाळेपेक्षा माफक आसेल.
- २. सदर कार्यशाळेचा कार्यकाळ संपल्या नंतर सहभागी विद्यार्थ्यांना घेऊन नाटक बसविण्यात येईल व त्याचा प्रयोग नाट्यगृहात सादर करण्याची संधी असेल .
- ३. १५ दिवसीय कार्यशाळे नंतर पुढील २० दिवस नाट्य तालमीचे असेल.
- ४. विद्यार्थ्यांना घेऊन लघुपट सुद्धा केला जाईल. ५. विद्यार्थांना वर्षभर संस्थेच्या इतर कार्यशाळेसाठी सवलत असेल.